शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आता रेल्वेमध्ये पार्सलचेही ‘अ‍ॅडव्हान्स बुकिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 10:25 IST

१२० दिवस आधी पार्सल वाहतूक करण्याकरिता अपेक्षित पार्सल भाड्याच्या १० टक्के रक्कम भरून पार्सलकरिता जागा आरक्षित करता येणार आहे.

अकोला : भारतीय रेल्वेने प्रवासी सुविधेत भर घालतानाच मालवाहतूक आणि पार्सल वाहतूक वाढविण्यास सुरुवात केली आहे. मालवाहतुकीस प्रोत्साहन देण्याकरिता या पूर्वीच विविध सवलती देण्यात येत आहेत. पार्सल वाहतुकीस चालना देण्यासाठी नियमित रेल्वे गाड्यांमध्ये तसेच टाइम टेबल पार्सल विशेष रेल्वे गाड्यांमध्ये यापुढे पार्सल वाहतुकीकरिता एसएलआर आणि पार्सल व्हॅन (व्हीपी) मध्ये जागा अ‍ॅडव्हान्स बुक करता येणार आहे. या सुविधेअंतर्गत १२० दिवस आधी पार्सल वाहतूक करण्याकरिता अपेक्षित पार्सल भाड्याच्या १० टक्के रक्कम भरून पार्सलकरिता जागा आरक्षित करता येणार आहे. उरलेले ९० टक्के पार्सल भाडे गाडीच्या सुटण्याच्या ७२ तास अगोदर भरावे लागणार आहे. ग्राहक ठरल्याप्रमाणे गाडीच्या ७२ तासांपूर्वी उरलेले पार्सल भाडे भरू शकला नाही तर अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या वेळेस भरलेले १० टक्के पार्सल भाडे जप्त केले जाईल आणि पार्सलची अ‍ॅडव्हान्स बुकिंग रद्द करण्यात येईल. या नवीन नियमानुसार नियमित प्रवासी गाड्यांमध्ये आणि टाइम टेबल पार्सल गाड्यांमध्ये पार्सल व्हॅनसुद्धा १२० दिवस अगोदर म्हणजेच अ‍ॅडव्हान्स बुक करता येणार आहे. याकरिता पूर्वीप्रमाणेच वॅगन डिमांड रजिस्ट्रेशन फीस भरावी लागणार आहे.७२ तासांपूर्वी रद्द करता येईल बुकिंगपार्सलसाठी बुक केलेली जागा रद्द करावयाची असेल तर गाडी सुटण्याच्या ७२ तास पूर्वी रद्द करता येईल. अशा परिस्थितीतही ग्राहकाला भरलेल्या रकमेच्या ५० टक्के रक्कम परत मिळेल; परंतु ७२ तासानंतर ग्राहकाला असे करता येणार नाही. तसेच काही कारणास्तव जर रेल्वे प्रशासनाने गाडी रद्द केली तर ग्राहकाला त्याने भरलेली पूर्ण रक्कम परत मिळेल.व्यापारी, व्यावसायिक व शेतकऱ्यांनी रेल्वेच्या या नव्या सुविधेचा फायदा घ्यावा आणि रेल्वेने पार्सल वाहतूक करून आपले पार्सल सुरक्षित आणि गतिशील पद्धतीने पुढे पोहोचवावे. अ‍ॅडव्हान्स बुकिंग करून आपल्या सामानाकरिता जागा सुरक्षित करावी आणि आपला व्यवसाय वाढवावा.- उपिंदर सिंघ, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानक