शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

२२४ ग्रामपंचायतींंमध्ये प्रशासकराज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 10:22 IST

सोमवारपासून जिल्ह्यातील संबंधित ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासकराज’ सुरू होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पाच वर्षांचा कालावधी संपणाऱ्या जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकांची नियुक्ती करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौरभ कटियार यांनी जिल्ह्यातील सातही पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांना (बीडीओ) २१ आॅगस्ट रोजी दिला. त्यामुळे सोमवारपासून जिल्ह्यातील संबंधित ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासकराज’ सुरू होणार आहे.जिल्ह्यातील सातही तालुक्यातील २२४ ग्रामपंचायतींमधील विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा पाच वर्षांचा कालावधी २४ ते ३१ आॅगस्टदरम्यान संपत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर सद्यस्थितीत ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येणार नसल्याने, शासनामार्फत देण्यात आलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील पाच वर्षांचा कार्यकाळ संपणाºया २२४ ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकांची नियुक्ती करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी जिल्ह्यातील सातही पंचायत समितींच्या गटविकास अधिकाºयांना २१ आॅगस्ट रोजी दिला. मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिलेला प्रशासक नियुक्तींचा आदेश जिल्हा परिषद पंचायत विभागामार्फत २२ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील सातही गटविकास अधिकाºयांना निर्गमित करण्यात आला.त्यामुळे प्रशासकांची नियुक्ती करण्यात आलेल्या जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींमध्ये सोमवार, २४ आॅगस्टपासून ‘प्रशासकराज’ सुरू होणार आहे.विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख ग्रां.पं. चे प्रशासक!राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांव्यतिरिक्त अधिकाºयांची ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदी जिल्ह्यातील पंचायत समित्यांमधील पंचायत विभाग, पशुसंवर्धन विभाग व शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी आणि जिल्हा परिषद शाळांमधील काही केंद्रप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाgram panchayatग्राम पंचायत