शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

प्रशासकीय मान्यता, पुनर्वसनात अडकले सिंचन प्रकल्प!

By admin | Updated: December 9, 2014 00:05 IST

खारपाणपट्टय़ाची तहान भागविणा-या नेर धामणाला हवाय अतिरिक्त निधी.

अकोला : पुनर्वसन, भूसंपादन, निधीची कमतरता आणि सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी पश्‍चिम विदर्भातील सिंचन प्रकल्पांची कामे रखडली असून, खारपाणपट्टय़ातील शेतकर्‍यांना वरदान ठरणार्‍या नेर धामणा प्रकल्प अतिरिक्त निधीच्या प्रतिक्षेत आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना सिंचन प्रकल्पांच्या पूर्ततेकरिता मागणीनुसार निधी उपलब्ध झाला नसल्याने पश्‍चिम विदर्भातील १९ प्रकल्पांपैकी ११ लघू, मध्यम व मोठय़ा सिंचन प्रकल्पांच्या कामांची गती खुंटली आहे. अकोला जिल्हय़ातील मुर्तिजापूर तालुक्यातील वाई संग्राहक या साठवण तलावाचे काम प्रशासकीय मान्यता आणि पुनर्वसनाच्या गर्तेत अडकले आहे. शहापूर बृहत प्रकल्पासाठी अद्याप प्रशासकीय मान्यताच मिळाली नसून, भूसंपादनाचा प्रश्नही अधांतरी लटकला आहे. या प्रकल्पांच्या पाटचार्‍या (कॅनॉल) बांधकामाचा प्रश्नही जैसे थे असल्याने, गत तीन-चार वर्षांपासून काम रखडले आहे. नया अंदुरा या प्रकल्पाच्या सांडव्याचा प्रश्न अनेक वर्ष रखडला होता. नाशिक येथील जल विज्ञान संस्थेने या प्रकल्पाचे नवे आरेखन (डिझाईन) दिले असले तरी, या कामाचा अद्याप शुभारंभ झाला नाही. खारपाणपट्टय़ातीलच कवठा बॅरेजचे आरेखन झाले नसल्याने या महत्त्वाच्या प्रकल्पाचेही काम सुरू च झाले नाही. दिल्ली येथील वॅबकॉस या संस्थेने या प्रकल्पाचे डिझाईन दिलेले आहे; तथापि राज्याच्या जलसंपदा विभागाला नाशिकच्या जलविज्ञान संस्थेचे आरेखन हवे असल्याने गत चार-पाच वर्षांपासून या बॅरेजचे काम सुरू झाले नसल्याचे चित्र आहे.मूर्तिजापूर तालुक्यातील उमा बॅरेजच्या कामाला पूनर्वसनाची आडकाठी निर्माण झाली आहे. यासंबंधीचा आराखडा दोन वर्षांपासून मंजूर झाला आहे. कॅनॉलला मंजुरी प्रदान झालेली आहे. पण प्रत्यक्षात काम होत नसल्याने या प्रकल्पाच्या कामाची गती खुंटली आहे. खारपाणपट्टय़ातील शेतकर्‍यांना वरदान ठरणार्‍या नेर धामणा बॅरेजला अतिरिक्त निधीची गरज आहे; परंतु या निधीची पूर्तता झाली नसल्याने या बॅरेजचे काम संथगतीने सुरू आहे. बुलडाणा जिल्ह्यातील पाच लघू प्रकल्पांपैकी कोलारी आणि दिग्रस या दोन प्रकल्पांची कामे अद्याप सुरू झाली नसून, उर्वरित तीन प्रकल्पांची कामे अर्धवट आहेत. राहेरा प्रकल्पाचे काम थंड बस्त्यात पडले आहे. बोरखडी आणि लोनवाडी या लघुप्रकल्पांची कामे अर्धवट आहेत. वाशिम, यवतमाळ आणि अमरावती जिल्हय़ातील प्रकल्पांना सुधारित मान्यता हवी आहे.