शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

म्युकरमोयकोसिसच्‍या रुग्‍णांसाठी पाच लाखापर्यंत खर्च प्रशासनाने द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:18 IST

अकोला : महात्‍मा फुले जन आरोग्‍य योजनेंतर्गत अकोला जिल्‍हयातील रुग्‍णालयात म्युकरमोयकोसिसवर उपचार करता येत नाही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ...

अकोला : महात्‍मा फुले जन आरोग्‍य योजनेंतर्गत अकोला जिल्‍हयातील रुग्‍णालयात म्युकरमोयकोसिसवर उपचार करता येत नाही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्‍णालय तसेच सामान्‍य रुग्‍णालय येथे या आजारावरील उपचाराशी संबंधित यंत्रसामुग्री उपलब्‍ध नाही. अनेक रुग्‍ण खाजगी रूग्‍णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. साधारणतः पाच ते साडेपाच लाख रूपये खर्च या आजारावरील उपचारासाठी येतो. यापैकी ५ लक्ष पर्यंतचा खर्च जिल्‍हा प्रशासनाने उचलावा, अशी मागणी जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे.

जिल्‍हयात म्युकरमोयकोसिसवर उपचार करण्यासाठी सामान्‍य रुग्‍णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्‍णालय येथे या आजारावर उपचारासाठी यंत्रसामुग्री उपलब्‍ध नाही. अनेक रुग्‍ण खाजगी रुग्‍णालयांमध्‍ये उपचारार्थ दाखल हात आहेत. याठिकाणी प्रत्‍येक रुग्‍णावर पाच ते साडेपाच लक्ष रू. खर्च होतात. त्‍यामुळे रुग्‍णाच्‍या कुटुंबीयांचे आर्थिकदृष्‍टया कंबरडे मोडत आहे, ते कर्जबाजारी होत आहे. महात्‍मा फुले जनआरोग्‍य योजनेंतर्गत आपण सदर रुग्‍णांना उपचार देऊ शकत नसल्‍याने जिल्हा परिषदेच्या विविध योजनांतर्गत या रुग्‍णांचा पाच लक्ष रू. पर्यंतचा खर्च आपण उचलणे आवश्‍यक आहे त्यामुळे हे संकट अधिक गडद होण्‍याआधी तातडीने जिल्हा प्रशासनाने सदर रूग्‍णांसाठी ५ लक्ष रू. खर्च उचलण्‍याचा निर्णय घेण्‍याची मागणी आमदार सावरकर यांनी केली आहे