शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आॅफलाइन पद्धतीने होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 13:13 IST

अकोला: २0१७-१८ च्या संचमान्यतेनुसार खासगी अनुदानित अल्पसंख्याक व बिगर अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया २७ नोव्हेंबरपूर्वी आॅफलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे.

अकोला: २0१७-१८ च्या संचमान्यतेनुसार खासगी अनुदानित अल्पसंख्याक व बिगर अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया २७ नोव्हेंबरपूर्वी आॅफलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. शिक्षण सचिवांसोबत झालेल्या ‘व्हीसी’मध्ये आॅफलाइन समायोजनाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सतत दोन वर्षे अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने राबविण्यात आली होती.समायोजनाची प्रक्रिया राबविण्यापूर्वी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील सर्वच शाळांकडून अतिरिक्त शिक्षक, आरक्षण, विषय, पटसंख्या आदी माहिती मागविली होती. माध्यमिक शिक्षण विभागाने ३४७ पैकी जवळपास ९५ टक्के शाळांची संचमान्यता पूर्ण केली आहे. सध्या शिक्षण विभागाकडे मराठी शाळांमधील ६३ आणि अल्पसंख्याक शाळांमधील ६३ अशा एकूण १२६ अतिरिक्त शिक्षकांची नावे आली आहेत. आॅफलाइन समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्यामुळे अल्पसंख्याक व बिगर अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची नावे पूर्ण माहितीसह कार्यालयात तपासून घ्यावी, ज्या शाळांनी अतिरिक्त शिक्षकांची माहिती सादर केली नाही, त्या शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाले नाही, तर त्याची जबाबदारी शिक्षण संस्था व मुख्याध्यापकांची राहील, असा इशारा शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिला आहे. ज्या शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरले आणि त्याच शाळांमध्ये रिक्त पदे असतील, तर त्यांचे तेथेच समायोजन करण्यात येणार आहे; परंतु रिक्त पदे नसतील तर दुसºया शाळेवर त्यांचे समायोजन करण्यात येईल. जिल्हा परिषद शाळांमधील पदे रिक्त असल्यास, अतिरिक्त शिक्षकांचे त्या रिक्त पदांवर समायोजन केल्या जाणार आहे. लवकरच अतिरिक्त शिक्षकांच्या नावांची यादी शिक्षणाधिकारी कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)अन्यथा वेतनाची जबाबदारी मुख्याध्यापकाची!२0१७-१८ संचमान्यतेनुसार ज्या शाळांनी रिक्त पदे व अतिरिक्त शिक्षकांची माहिती समायोजन पोर्टलमध्ये भरली नाही, त्यांना २२ नोव्हेंबरपर्यंत ही माहिती कार्यालयात सादर करायची होती. काही शाळांनी ही गुरुवारी सादर केली; परंतु अनेक शाळांनी माहिती सादर केली नसल्यामुळे त्या शाळांमधील संबंधित शिक्षकांच्या वेतनाची जबाबदारी मुख्याध्यापकांची राहील, असेही शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक