शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया  लवकरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:34 IST

माध्यमिक शिक्षण विभागाने अतिरिक्त  ठरणार्‍या शिक्षकांची माहिती जिल्हय़ातील शाळांना  मागितली असून, शाळांनी ही माहिती शिक्षण  विभागाकडे पाठविली आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही  अतिरिक्त ठरणार्‍या शिक्षकांच्या समायोजनाची  ऑनलाइन पद्धतीने प्रक्रिया लवकरच होणार आहे.  

ठळक मुद्देसुनावणी सुरू यंदाही १४0 शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : माध्यमिक शिक्षण विभागाने अतिरिक्त  ठरणार्‍या शिक्षकांची माहिती जिल्हय़ातील शाळांना  मागितली असून, शाळांनी ही माहिती शिक्षण  विभागाकडे पाठविली आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही  अतिरिक्त ठरणार्‍या शिक्षकांच्या समायोजनाची  ऑनलाइन पद्धतीने प्रक्रिया लवकरच होणार आहे.  त्यापूर्वी शिक्षणाधिकारी कार्यालयात अतिरिक्त  ठरणार्‍या शिक्षकांनी दाखल केलेल्या आक्षेपांवर  सुनावणी घेण्यात येत आहे. सुनावणीची प्रक्रिया पूर्ण  होताच, समायोजनाची प्रक्रिया सुरू होईल. गतवर्षी जिल्हय़ामध्ये ११७ शिक्षक अतिरिक्त ठरले  होते. यातील काही शिक्षक वगळता, उर्वरित  शिक्षकांचे रिक्त जागा असलेल्या शाळांवर समायोजन  करण्यात आले होते. यावर्षीसुद्धा माध्यमिक शिक्षण  विभागाने जिल्हय़ातील शाळांकडून शिक्षकांची  पदसंख्या, आरक्षण, रिक्त पदे याची माहिती  मागविली. जिल्हय़ातील जवळपास ८२ शाळांनी  त्यांच्या संचमान्यतेसंबंधीचे प्रस्ताव शिक्षण  विभागाकडे पाठविले आहेत. संचमान्यतेच्या प्रस् तावामधील त्रुटी दूर करण्याचे काम सुरू आहे.  जिल्हय़ातील माध्यमिक शाळांमध्ये यावर्षी १४0 च्या  जवळपास शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता  आहे, तसेच शाळांमधील ७0 ते ८0 जागा रिक्त  असणार असून, या जागांवर अतिरिक्त शिक्षकांचे  समायोजन करण्यात येईल. 

अतिरिक्तची शिक्षकांना भीती२0१६ व १७ ची नवीन संचमान्यतेची प्रक्रिया  राबविण्यात येत असून, या प्रक्रियेदरम्यान शाळांमध्ये  अतिरिक्त ठरणार्‍या शिक्षकांची ऑनलाइन माहिती  मागविण्यात आली आहे. सेवाज्येष्ठतेनुसार त्यांची प्र तीक्षा यादी तयार करण्यात येत आहे. 

सध्या सुनावणी प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया सं पल्यानंतर अतिरिक्त शिक्षक समायोजनाची प्रक्रिया  सुरू होईल. गतवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हय़ात १४0  च्या जवळपास शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता  आहे. - प्रकाश मुकुंद,शिक्षणाधिकारी.