शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सुट्यानंतर अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे  समायोजन     

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 01:27 IST

शिक्षण विभागाने अल्पसंख्याक  शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांची माहिती, रिक्त पदे, आरक्षण  व विषयाची माहिती मागविली आहे. जवळपास माहिती  संकलनाचे काम पूर्णत्वास आले असून, दिवाळीच्या सुट्या सं पल्यानंतर समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात येईल. 

ठळक मुद्देमाहिती संकलित अतिरिक्तच्या यादीत आपले नाव येऊ नये, यासाठी प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने जिल्हय़ातील  अल्पसंख्याक शाळांमधील अतिरिक्त ठरणार्‍या शिक्षकांचे  दिवाळीच्या सुट्या संपल्यानंतर समायोजनाची प्रक्रिया  राबविण्यात येणार आहे. शिक्षण विभागाने अल्पसंख्याक  शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांची माहिती, रिक्त पदे, आरक्षण  व विषयाची माहिती मागविली आहे. जवळपास माहिती  संकलनाचे काम पूर्णत्वास आले असून, दिवाळीच्या सुट्या सं पल्यानंतर समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात येईल. जिल्हय़ातील मराठी शाळांमधील ७१ पैकी ४२ शिक्षकांचे  जिल्हय़ातील विविध शाळांमधील रिक्त पदांवर समायोजन  केल्यानंतर आता जिल्हय़ातील अल्पसंख्यक शाळांमधील अ ितरिक्त ठरणार्‍या शिक्षकांचा क्रमांक लागणार आहे. अल्पसं ख्याक शाळांमधील अंदाजे ८0 शिक्षक अतिरिक्त ठरण्याची  शक्यता आहे. त्यामुळे अल्पसंख्याक शाळांमधील  शिक्षकांमध्येही अतिरिक्त ठरण्याची धास्ती निर्माण झाली असून,  अतिरिक्त ठरल्यानंतर आपले समायोजन होईल की नाही आणि  बाहेरगावी झालेच तर काय करावे, अशी चिंता शिक्षकांना सतावू  लागली आहे. अतिरिक्तच्या यादीमध्ये आपले नाव येऊ नये, यासाठी अनेक  शिक्षक देवाला साकडे घालत आहेत. माध्यमिक शिक्षण  विभागाने अतिरिक्त ठरणार्‍या शिक्षकांची जिल्हय़ातील  अल्पसंख्याक शाळांना शिक्षकांची पदसंख्या, आरक्षण, रिक्त  पदे याची माहिती मागविली आहे. माहिती प्राप्त झाल्यानंतर काही  दिवसांतच अल्पसंख्याक  शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या  शिक्षकांची यादी प्रकाशित    करण्यात येईल आणि दोन दिवस  शिक्षकांना हरकती नोंदविण्यासाठी वेळ देण्यात येईल. त्यानंतर  सुनावणी घेऊन लगेच अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची  प्रक्रिया राबविण्यात येईल. 

शाळा न निवडल्यास सेवासमाप्तीअतिरिक्त शिक्षकांचे ऑनलाइन समायोजन करताना, आरक्षण  आणि विषयाचा विचार करण्यात येत आहे. अतिरिक्त शिक्षकांना  पाच ते सहा राऊंडपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. त्यातही  ऑनलाइन शाळा निवडताना, कोणाला दोन ते कोणाला एकच  शाळा पर्याय म्हणून मिळते. त्यामुळे विचार करायलाही वेळ मिळत नाही. शिक्षकाला शाळा  पसंत नसल्यावरही त्याला शाळा निवडणे भागच आहे. कारण  शाळा निवडली नाही, तर शिक्षण विभागाला मूळ आस्थापना  असलेल्या शाळेला पत्र देऊन संबंधित शिक्षकांची सेवासमाप्ती  करण्याचे अधिकार आहेत. 

संचमान्यता दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. शाळांकडून अ ितरिक्त शिक्षकांची माहिती मागविण्यात आली असून, दिवाळीची  सुटी संपल्यानंतर शिक्षक समायोजनाची प्रक्रिया सुरू होईल. - प्रकाश मुकुंद, शिक्षणाधिकारी

टॅग्स :Teacherशिक्षक