शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

टायपिंगच्या विश्वविक्रमात नोंदीसाठी आदित्यचा प्रयत्न!

By admin | Updated: June 30, 2017 01:28 IST

अकोला : आदित्य सुरेश गावंडे याने वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षीच कॉम्प्युटर टायपिंगमध्ये हैदराबाद येथील खुर्शीद हुसेन यांचा उच्चांक मोडून अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : लहान उमरी परिसरात राहणारा आदित्य सुरेश गावंडे याने वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षीच कॉम्प्युटर टायपिंगमध्ये हैदराबाद येथील खुर्शीद हुसेन यांचा उच्चांक मोडून अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या विश्वविक्रमाची नोंद गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होण्यासाठी आदित्य प्रयत्न करीत आहे.गुरुवारी स्थानिक हॉटेलमध्ये बोलाविण्यात आलेल्या पत्रकार-परिषदेत आदित्यने आपल्या आगळ््या वेगळ््या विश्वविक्रमाची माहिती दिली. यावेळी सेफ हॅण्डचे प्रा. नितीन ओक, आदित्यचे वडील सुरेश गावंडे उपस्थित होते. आदित्यने सांगितले, की इयत्ता आठवीमध्ये असताना टायपिंग करण्याची गोडी लागली. आज जवळपास पाच वर्षांपासून टायपिंग स्पीड कसा जास्तीत जास्त होईल, यासाठी प्रयत्न करीत आहे. एकदा इंटरनेटवर सहज सर्फिंग करीत असताना टायपिंगची माहिती जाणून घेण्याची उत्कंठा लागली. यावेळी गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डची वेबसाईट त्यामध्ये काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सहज म्हणून त्यामध्ये कॉम्प्युटर टायपिंगमध्ये हैदराबाद येथील खुर्शीद हुसेन यांच्या नावाची नोंद दिसली. आपलेही नाव गिनीज बुक आॅफ रेकॉर्डमध्ये असावे, असे मनात येऊन गेले. त्या दिवसापासून टायपिंगचं वेड लागले. रात्री-अपरात्री जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अभ्यास सांभाळून टायपिंगचा वेग वाढविण्याचे प्रयत्न केले.आदित्य पुढे म्हणाला, की खुर्शीद हुसेन यांनी ३ सेकंद ४३ मिनी सेंकदात ए टू झेड शब्द स्पेस पकडून एकूण ५१ वेळा की बोर्डची बटने दाबून आपले नाव गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविले. हा त्यांचा उच्चांक मोडण्याची मनाशीच पक्की गाठ बांधून, त्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे ठरविले. याकरिता माझ्या पालकांची भरपूर साथ मिळाली. मी कित्येक की बोर्डही टायपिंग करताना तोडले. प्रत्येक वेळी नवीन की बोर्ड आणताना घरच्यांना पहिला बोर्ड तुटल्याचे सांगावे लागायचे. तेही शेवटी कंटाळून, हा फालतूपणा आता सोडून दे म्हणू लागले. माझी चिकाटी पाहून घरच्यांनी संपूर्ण सहकार्य केले. परत प्रवास सुरू झाला. आज ३ सेंकद ३५ मिनी सेंकदात ए टू झेड शब्द स्पेस पकडून एकूण ५१ वेळा की बोर्डची बटने दाबू शकतो. म्हणजेच ८ मिनी सेकंदाचा फरक असल्याने माझ्या नावाची नोंद गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होईल, असे ठामपणे आदित्यने सांगितले.