शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदीत २० कोटींच्या भ्रष्टाचारानंतरही कारवाईला बगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 13:50 IST

अकोला: नाफेडने सुरू केलेल्या तूर खरेदी केंद्रात २० कोटी ३९ लाखांचा भ्रष्टाचार करणाऱ्या व्हीसीएमएफ, कृषी उत्पन्न बाजार समिती, तालुका खरेदी-विक्री संघाने संगनमत केल्याचे ३ जुलै रोजीच्या चौकशी अहवालात उघड झाले.

अकोला: नाफेडने सुरू केलेल्या तूर खरेदी केंद्रात २० कोटी ३९ लाखांचा भ्रष्टाचार करणाऱ्या व्हीसीएमएफ, कृषी उत्पन्न बाजार समिती, तालुका खरेदी-विक्री संघाने संगनमत केल्याचे ३ जुलै रोजीच्या चौकशी अहवालात उघड झाले. फौजदारी प्रक्रियेत असताना विभागीय सहनिबंधकांनी चौकशीला स्थगिती दिल्यानंतर अद्यापही पुढील कारवाई न झाल्याने याप्रकरणी पाणी मुरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, अशाच प्रकरणात बार्शीटाकळी खरेदी-विक्री संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १४ नोव्हेंबर रोजी दिला होता.आधारभूत दराने तूर खरेदी करण्यासाठी नाफेडने २०१७ मध्ये अकोट सहकारी खरेदी-विक्री संघाला काम दिले. या प्रक्रियेतून खरेदी-विक्री संघाने माघार घेतल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट व ‘व्हीसीएमएफ’ यांना खरेदी केंद्रातील काम देण्यात आले. अकोट केंद्रातील तूर खरेदीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गजानन पुंडकर यांनी केली होती. त्यावर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी अकोला जिल्हाधिकारी यांना चौकशी करण्याचा आदेश दिला होता. जिल्हाधिकाºयांच्या आदेशाने जिल्हा उपनिबंधकांनी अकोटचे सहायक निबंधक शेकोकार यांच्या पथकाकडे चौकशी दिली. चौकशीचा अहवाल ३ जुलै २०१८ रोजी देण्यात आला. त्यामध्ये अडीच महिन्यांच्या कालावधीत २० कोटी ३९ लाख रुपयांच्या तूर खरेदीत व्हीसीएमएफ, कृषी उत्पन्न बाजार समिती व तालुका खरेदी-विक्री यांनी संगनमताने भ्रष्टाचार केल्याचे पुढे आले. त्यावरून अकोट पोलीस ठाण्यात तक्रारही देण्यात आली; मात्र तत्कालीन ठाणेदारांनी उपविभागीय पोलीस अधिकाºयांचे मार्गदर्शन मागविले. त्याच काळात चौकशी अहवालाला विभागीय सहनिबंधकांकडे आव्हान देण्यात आले. सहनिबंधकांनी चौकशी अहवालाला स्थगनादेश दिला. जुलैपासून त्या स्थगनादेशानंतर पुढे कुठलीच कारवाई प्रशासनाकडून झालेली नाही. तूर खरेदीत आठ कोटींपर्यंत रकमेचा भ्रष्टाचार निश्चितच झाल्याचे पुढे येत आहे; मात्र कारवाई होत नसल्याने या प्रकरणात पाणी मुरत असल्याची शंका व्यक्त होत आहे.

बार्शीटाकळीत कारवाई; अकोटला सूटमुख्यमंत्री फडणवीस यांनी बार्शीटाकळी खविसं बरखास्त करून संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला. त्याचवेळी अकोट खविसं, कृषी उत्पन्न बाजार समिती, ‘व्हीसीएमएफ’ने केलेल्या भ्रष्टाचाराबाबत काहीही केले नाही. ही कारवाई तातडीने करावी, अशी मागणी पुंडकर यांनी केली आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला