अकोला : जिल्ह्यात बुधवार ४ नोव्हेंबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १४ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ८,४८४ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे १२६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ११२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये मुर्तीजापूर येथील चार, डाबकी रोड व वृंदावण नगर येथील प्रत्येकी दोन, तर बाळापूर, हेंडज ता. मुर्तिजापूर, कवठा ता. मुर्तिजापूर, कावसा ता. अकोट, शिवणी खु. ता. मुर्तिजापूर व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.२१२ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८,४८४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ७,९९० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २८१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत २१२ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
अकोला जिल्ह्यात आणखी १४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 12:18 IST
Akola coronavirus News एकूण रुग्णसंख्या ८,४८४ झाली आहे.
अकोला जिल्ह्यात आणखी १४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर
ठळक मुद्दे२१२ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. एकूण रुग्णसंख्या ८,४८४ झाली आहे.