शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

 पीक विम्याची रक्कम १५ जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा! - जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 14:28 IST

अकोला: प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामात विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात १५ जूनपूर्वी पीक विम्याची रक्कम जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी संबंधित विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्दे नियोजन सभागृहात आयोजित कृषीविषयक जिल्ह्यातील विविध कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाºयांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा व कृषी समृद्धी समन्वित कृषी विकास प्रकल्प अंतर्गत कामांचा आढावादेखील जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी घेतला.

अकोला: प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामात विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात १५ जूनपूर्वी पीक विम्याची रक्कम जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी संबंधित विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित कृषीविषयक जिल्ह्यातील विविध कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी    अकोला  जिल्ह्यात २४ मे ते ७ जून दरम्यान ‘उन्नत शेती-समृद्ध शेतकरी’ पंधरवडा राबविण्यात येत असून, ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाºयांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, उप-जिल्हाधिकारी अशोक अमानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, ‘आत्मा’चे प्रकल्प अधिकारी बावीस्कर, ‘केम’च्या जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक माधुरी सरोदे, अकोल्याचे उप-विभागीय अधिकारी संजय खडसे यांच्यासह जिल्ह्यातील उप-विभागीय अधिकारी, तहसीलदार, कृषी विभागाचे अधिकारी व विमा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. सन २०१७ च्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख ४७ हजार ५६६ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. त्यासाठी ९ कोटी ५८ लाख रुपये विमा हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली होती. पीक विमा काढलेल्या शेतकºयांसाठी पीक नुकसान भरपाईपोटी ११८ कोटी ३९ लाख रुपये विम्याची रक्कम मंजूर करण्यात आली. मंजूर करण्यात आलेली पीक विम्याची रक्कम १५ जूनपूर्वी जिल्ह्यातील संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी संबंधित विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.जिल्ह्यात उन्नत शेती-समृद्ध शेतकरी पंधरवडा राबविण्यात येत असून, या मोहिमेत कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाºया कृषी विकास व शेतकरी कल्याणाच्या विविध योजनांचा प्रचार-प्रसार करण्याच्या सूचना देत, योजनांचा जिल्ह्यातील शेतकºयांनी लाभ घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकाºयांनी केले. उन्नत शेती-समृद्ध शेतकरी पंधरवड्यात जिल्ह्यात ७३१ सभांचे आयोजन करण्यात आले असून, कृषी तज्ज्ञ, शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे या मोहिमेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करून मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. हवामान आधारित फळपीक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा व कृषी समृद्धी समन्वित कृषी विकास प्रकल्प अंतर्गत कामांचा आढावादेखील जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी घेतला.

अपघात विम्याचे प्रलंबितप्रस्ताव मार्गी लावा!गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी या बैठकीत दिले.

 

टॅग्स :AkolaअकोलाAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेयagricultureशेती