शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

हरभरा घोटाळ्यात १३६ कृषी केंद्रांवर होणार कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 12:26 IST

अकोला: राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून शासनाने अनुदानित दरात दिलेले हरभरा बियाणे वाटपात ९० लाखांपेक्षाही अधिक रकमेचा घोटाळा करणाऱ्या जिल्ह्यातील १३६ कृषी केंद्रांवर अखेर कारवाईचा फास आवळला जाणार आहे.

ठळक मुद्देकारवाई करण्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी चालविलेली चालढकल कृषी आयुक्तांचा दणक्याने थांबली आहे.आयुक्तांच्या पथकाने या संपूर्ण प्रकरणाची झाडाझडती अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात घेतली.

- सदानंद सिरसाटअकोला: राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून शासनाने अनुदानित दरात दिलेले हरभरा बियाणे वाटपात ९० लाखांपेक्षाही अधिक रकमेचा घोटाळा करणाऱ्या जिल्ह्यातील १३६ कृषी केंद्रांवर अखेर कारवाईचा फास आवळला जाणार आहे. कारवाई करण्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी चालविलेली चालढकल कृषी आयुक्तांचा दणक्याने थांबली आहे. गुरुवार, शुक्रवारी आयुक्तांच्या पथकाने या संपूर्ण प्रकरणाची झाडाझडती अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात घेतली.राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून शासनाने २०१६ च्या रब्बी हंगामात हरभरा बियाणे अनुदानावर वाटपाची योजना राबविली. त्या योजनेचा फायदा अकोला जिल्ह्यातील शेतकºयांना नव्हे, तर अकोला शहरातील चार वितरकांसह ग्रामीण भागातील १३६ कृषी केंद्र संचालकांनीच घेतल्याचे आता पुढे आले आहे. शेतकºयांना मिळणाºया अनुदानाचा लाखो रुपयांचा मलिदा लाटणाºया या केंद्र संचालकांची नावे जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाºयांच्या चौकशीत पुढे आली. अमरावती विभाग कृषी सहसंचालकाच्या पथकानेही अनियमिततेवर बोट ठेवले. ज्या लाभार्थींना अनुदानित हरभरा मिळणे आवश्यक होते, त्यांना ते मिळालेच नाही. त्यांच्या नावे वितरक, कृषी केंद्र संचालकांनी बियाण्यावरील अनुदानाचा मलिदा ओरपला. यामध्ये जवळपास ९० लाख रुपये अनुदानाचा घोटाळा झाला. विशेष म्हणजे, या प्रकरणात दोषी आढळलेल्या सर्वच कृषी केंद्र संचालकांची जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाºयांनी सुनावणी घेतली. त्यानंतर ६ जानेवारी २०१८ रोजीच्या अधिसूचनेनुसार कृषी केंद्र परवाना, बियाणे, खते विक्री, साठवणूक परवान्याचे अधिकार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांकडे वर्ग झाले. त्यामुळे हरभरा घोटाळ्यातील संपूर्ण प्रकरणे त्यांच्याकडे देण्यात आली. त्यानंतर वर्षभरापासून ही कारवाई थंड बस्त्यात होती.

‘लोकमत’ने दिली आठवण!दरम्यान, अनुदानित बियाणे वाटपासाठी पुरवठादार म्हणून नियुक्त केलेल्या महाबीज, कृभको, राष्ट्रीय बियाणे महामंडळाला देय असलेले अनुदानही रोखण्यात आले. त्याचवेळी हा घोटाळा करणाºया कृषी केंद्र संचालकांना कारवाईतून सूट देण्यात आली. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने १८, १९ आॅगस्ट २०१८ रोजी प्रसिद्ध करीत अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला स्मरण दिले होते. त्यानंतर थेट आयुक्तांच्या पथकानेच धाव घेत प्रकरणाचा धांडोळा घेतला.

कारवाईसाठी १३६ केंद्रांचा अहवालअधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून आता १३६ कृषी केंद्र संचालकांवर कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे. आयुक्तांनी हा घोटाळा गांभीर्याने घेतल्याने अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांची गोची झाली आहे.

कारवाई होणारे तालुकानिहाय सेवा केंद्रतालुका केंद्र संख्याअकोला ३८तेल्हारा २७मूर्तिजापूर ११पातूर १४अकोट २२बाळापूर १३बार्शीटाकळी ११

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती