शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

'शॉप अ‍ॅक्ट' परवान्याच्या नावाखाली लुटणाऱ्यांवर आता कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 16:08 IST

अकोला : शॉप अ‍ॅक्ट परवान्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लुटल्या जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशझोतात आणल्यानंतर इन्कम टॅक्स चौकातील शॉप अ‍ॅक्ट कार्यालयाने त्याची गंभीर दखल घेतली.

अकोला : शॉप अ‍ॅक्ट परवान्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लुटल्या जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशझोतात आणल्यानंतर इन्कम टॅक्स चौकातील शॉप अ‍ॅक्ट कार्यालयाने त्याची गंभीर दखल घेतली. लूट करणाºया एजंटविरुद्ध कारवाई करण्यासाठी मोहीम राबविली जाणार असल्याचे शॉप अ‍ॅक्ट कार्यालयाचे निरीक्षक जोशी यांनी सांगितले.शॉप अ‍ॅक्ट परवाना मिळविण्याची संपूर्ण प्रक्रिया आॅनलाइन झाली आहे. आॅनलाइन परवानाचे शुल्क केवळ २३ रुपये असताना, ग्राहकांकडून सातशे ते पंधराशे रुपये घेतले जातात. सायबर कॅफे, सर्व्हिस सेंटर आणि काही एजंटचा हा गोरखधंदा गत काही महिन्यांपासून जोरात आहे. अनेकांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय आणि शॉप अ‍ॅक्ट निरीक्षक कार्यालयाकडे नोंदविली; मात्र त्याचा काहीही परिणाम झाला नाही. दरम्यान, या वृत्ताला ‘लोकमत’ने प्रकाशझोतात आणले. त्यामुळे अनेकांनी लूट होत असल्याच्या बाबीला दुजोरा दिला. त्यामुळे शॉप अ‍ॅक्ट परवाना गोरक्षण मार्ग कार्यालयाचे निरीक्षक जोशी यांनी गंभीर दखल घेत याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याचे सांगितले. आता लूट थांबते की तशीच सुरू राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. जिल्हाधिकाºयांनी आढावा घेण्याची गरज!परवाना देण्याच्या नावाखाली चक्क २३ रुपये शुल्काऐवजी पंधराशे रुपये घेतल्या जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. जिल्हाधिकारी यांनी या प्रकाराकडे लक्ष देऊन आढावा घेण्याची गरज आहे, असे फसवणूक झालेल्यांकडून बोलल्या जात आहे. त्यामुळे शॉप अ‍ॅक्ट निरीक्षक आणि जिल्हाधिकारी यांनी संयुक्तपणे कारवाई करण्याची वेळ आली आहे.

 

टॅग्स :Akolaअकोला