शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गोंधळी मद्यपींवर १२ तासांत कारवाई

By admin | Updated: April 20, 2017 00:51 IST

अवैध धंदे, दारूबंदीसाठी ग्रामरक्षक दलाचा आधार

अकोला : दारू पिऊन गोंधळ घालणारे, मारामारी करणाऱ्यांची माहिती मिळताच बारा तासांच्या आत पोलीस त्या व्यक्तीला पकडून गुन्हे दाखल करणार आहेत. त्यासाठी प्रत्येक गावात ग्रामरक्षक दल कायद्यानुसार स्थापन करण्याचे निर्देश गृह विभागाने पोलीस विभागासह उत्पादन शुल्क विभागाला मंगळवारी दिले आहेत. अवैध दारू उत्पादन, वाहतूक, विक्री होत असल्यास या प्रकारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी दारूबंदी अधिनियम करण्यात आला आहे. १६ जानेवारी २०१७ रोजी महाराष्ट्र दारूबंदी (सुधारणा) अधिनियम २०१६ प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्येच ग्राम स्तरावर ग्रामरक्षक दल स्थापन करण्याची अधिसूचनाही २२ मार्च २०१७ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यावर अद्यापही कार्यवाही सुरू न झाल्याने गृह विभागाने १८ एप्रिल रोजी नव्याने आदेश दिले आहेत.महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील तरतुदीनुसार ग्रामरक्षक दलाने गावातील अवैध धंदे, दारू विक्री, वाहतूक करणे, जवळ बाळगणे याबाबतची माहिती पोलिसांना, उत्पादन शुल्क विभागाला द्यावयाची आहे. माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेशात बजावण्यात आले आहे.बारा तासांत कारवाई करा!अवैध दारू उत्पादन, विक्रीसंदर्भात ग्रामरक्षक दलाने माहिती देताच पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने १२ तासांच्या आत कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे बजावण्यात आले.नशेत असल्याची वैद्यकीय तपासणीगावात दारू पिऊन गोंधळ घालणारे, मारामारी करणाऱ्या व्यक्तीची माहिती पोलिसांना मिळताच तो नशेत असेपर्यंत शक्य तितक्या लवकर ताब्यात घेतले जाणार आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कारवाई केली जाईल. सराईताला हद्दपारीचा प्रस्तावअवैध दारू निर्मिती, विक्री तसेच दारूविषयी गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या सराईत व्यक्तीविरुद्ध कारवाई करताना चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र घेतले जाईल. सातत्याने हा प्रकार घडत असल्यास हद्दपारीची कारवाई प्रस्तावित होणार आहे. हा प्रस्ताव सादर न केल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.