शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पाच अवैध सावकारांविरुद्ध कारवाई; १.४० लाखाच्या रोकडसह १०० ग्रॅम सोने, दस्तऐवज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 13:34 IST

अकोला: शहरासह व्याळा येथील पाच ठिकाणी अवैध सावकारांच्या घरांवर धाडी टाकून पाच अवैध सावकारांविरुद्ध जिल्हा उपनिबंधक (डीडीआर) कार्यालयाच्या पथकांनी शुक्रवारी कारवाई केली.

ठळक मुद्देअकोला शहरातील चार ठिकाणी आणि व्याळा येथील एका ठिकाणी अवैध सावकारांच्या घरावर धाडी टाकल्या. सकाळी १० वाजतापासून रात्री ९.३० वाजेपर्यंत धाड पथकांकडून ही कारवाई करण्यात आली. १ लाख ३९ हजार ७२० रुपयांच्या रोकडसह १०० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि अवैध सावकारी व्यवहाराचे दस्तावेज जप्त करण्यात आले.

अकोला: शहरासह व्याळा येथील पाच ठिकाणी अवैध सावकारांच्या घरांवर धाडी टाकून पाच अवैध सावकारांविरुद्ध जिल्हा उपनिबंधक (डीडीआर) कार्यालयाच्या पथकांनी शुक्रवारी कारवाई केली. त्यामध्ये १ लाख ३९ हजार ७२० रुपयांच्या रोकडसह १०० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि अवैध सावकारी व्यवहाराचे दस्तावेज जप्त करण्यात आले.जिल्हा उपनिबंधक जी.जी. मावळे यांच्यासह पाच पथकांनी अकोला शहरातील चार ठिकाणी आणि व्याळा येथील एका ठिकाणी अवैध सावकारांच्या घरावर धाडी टाकल्या. त्यामध्ये अकोल्यातील रामदासपेठ भागात श्यामकुमार सुंदरलाल लोहिया, डाबकी रोडस्थित गणेश नगरमधील डॉ. गणेश शिवराम मेहरे, निमवाडीमधील नानक नगरमध्ये मीरा दयाराम फुलवानी, वाशिम रोड बायपास येथील गजानन शालीग्राम शिरसाट यांच्या घरी धाडी टाकण्यात आल्या. त्यामध्ये अवैध सावकारांच्या घरातून रोख १ लाख ३९ हजार ७२० रुपये, १०० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि अवैध सावकारी व्यवहाराचे दस्तावेज जप्त करून, संबंधित अवैध सावकारांविरुद्ध कारवाई करण्यात आली. सकाळी १० वाजतापासून रात्री ९.३० वाजेपर्यंत धाड पथकांकडून ही कारवाई करण्यात आली.जप्त केलेला असा आहे मुद्देमाल!अवैध सावकारांच्या घरांवर धाडी टाकून मुद्देमालासह दस्तऐवज जप्त करण्यात आले. त्यामध्ये श्यामकुमार लोहिया यांच्या घरातून अवैध सावकारी व्यवहाराचे ६७ खरेदी खते व विक्री पावती, ५ मुखत्यारपत्र, १०० व ५०० रुपयांचे कोरे बॉण्ड, १ समझोता लेख, १ इसार पावती, ४ ताबा पावती, १ टोकन पावती, २८ सात-बारा व फेरफार. डॉ. गणेश मेहरे यांच्या घरातून ११५ खरेदी खते, ३८ कोरे बॉण्ड, २३ इसार पावती, ९३ धनादेश, २२ ठोका पावत्या, ४ नोंदी रजिस्टर, ४ बँक पासबुक, सोनाराला व्याजाने पैसे दिल्याच्या ५५ पावत्या, १ करारनामा, वाहनाचे १ आरसी बुक, मीरा फुलवाणी यांच्या घरातून ६ इसार पावत्या, १२ कोरे धनादेश, ४ नोंदी रजिस्टर, वाहनांचे ३ आरसी बुक, १ लाख ४ हजार ५२० रुपये रोख रक्कम, १०० ग्रॅम सोन्याचे दागिने. सचिन वानखडे यांच्या घरातून १ कोरा बॉण्ड, तर गजानन शिरसाट यांच्या घरातून ४ कोरे बॉण्ड, ७ कोरे धनादेश, १ नोंदी रजिस्टर व ३५ हजार २०० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. 

विविध पाच ठिकाणी अवैध सावकारांच्या घरांवर धाडी टाकून कारवाई करण्यात आली. अवैध सावकारीच्या व्यवहारातील दस्तऐवज, धनादेश व रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, कागदपत्रांची पडताळणी करून यासंदर्भात संबंधित अवैध सावकारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.- जी.जी. मावळेजिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

 

टॅग्स :Akolaअकोला