शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

एका वर्षात जिल्ह्यातील आठ कुंटणखान्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 15:10 IST

उच्चभ्रू वस्त्यांमध्ये सुरू असलेल्या आठ देहव्यापाराच्या अड्ड्यांचे अकोला पोलीस प्रशासनाने एका वर्षात कंबरडे मोडले.

अकोला : शहरातील प्रतिष्ठितांच्या ठिकाणी असलेल्या जठारपेठ, बलोदे ले-आउट, मोठी उमरीतील इंजिनिअरिंग कॉलनी, देवराव बाबा चाळ, मलकापूर रोडवरील अंबिका नगर, जुने शहरातील पार्वती नगरसारख्या उच्चभ्रू वस्त्यांमध्ये सुरू असलेल्या आठ देहव्यापाराच्या अड्ड्यांचे अकोला पोलीस प्रशासनाने एका वर्षात कंबरडे मोडले.कौटुंबिक परिस्थिती, हायफाय शौक पूर्ण करण्यासाठी मजबुरी तसेच ब्लॅकमेलिंग या विविध कारणांमुळे वेश्या व्यवसायात ओढल्या गेलेल्या युवतींवर दबाव टाकून हा व्यवसाय करण्यात येत असल्याचेही शहरासह जिल्ह्यातील आठ ठिकाणांच्या कारवायांवरून समोर आले आहे. मलकापूर रोडवरील अंबिका नगरमध्ये एका शिक्षकाच्या घरातच देहविक्रय अड्डा सुरू असताना सदर शिक्षकाने मात्र याकडे कानाडोळा करीत या धंद्याला मूकसंमती दिली होती. त्यानंतर येवता येथील एका घरात असलेल्या दोन युवती या नागपूर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले असून, तेथील एजंटद्वारे त्यांना अकोल्यात पाठविण्यात आले होते, तर जठारपेठेतील ज्योती नगरातील कुंटणखान्यामध्ये तीन युवतींना ताब्यात घेण्यात आले होते. यासोबतच समता कॉलनीत एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या कुंटणखान्यातील तीन महिला केवळ कौटुंबिक परिस्थिती व उदरनिर्वाहासाठी या व्यवसायात ओढल्या गेल्याची माहिती आहे. डाबकी रोडवर आढळलेली पीडित युवती मात्र शौकाखातर या व्यवसायात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. देवराव बाबा चाळीमध्ये एका घरातून अटक केलेल्या दोन मुलीही केवळ त्यांचे व्यसन पूर्ण करण्यासाठी या धंद्यात उतरल्या होत्या. मोठी उमरीतील इंजिनिअरिंग कॉलनीत सुरू असलेल्या कुंटणखान्यावर तर थक्क करणारी माहिती समोर आली असून, या ठिकाणावर महाविद्यालयातील तरुणीच मोठ्या प्रमाणात सहभागी असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. त्यानंतर विशेष पथकाने बलोदे ले-आउटमधील आरोग्य नगरमध्ये केलेल्या कारवाईत तीन मुली व महिला या कुटुंबाचा उदरनिर्वाह तसेच वैयक्तिक आयुष्य मजेत जगण्यासाठी हा व्यवसाय करीत असल्याची माहिती उघड झाली आहे. एका वर्षात पोलिसांनी धाडसत्र राबवून या अड्ड्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न केला असून, त्यानंतर आता हे अवैध धंदे पोलिसांच्या रडारवर आहेत.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी