शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

एका वर्षात जिल्ह्यातील आठ कुंटणखान्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 14:43 IST

उच्चभ्रू वस्त्यांमध्ये सुरू असलेल्या या अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे.

अकोला : शहरासह जिल्ह्यातील आठ कुंटणखान्यांवर अकोला पोलीस प्रशासनाने कारवाई करीत सुमारे १९ युवती व महिलांची सुटका केली असून, १६ वर आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. जठारपेठ, बलोदे ले-आउट, मोठी उमरीतील इंजिनिअरिंग कॉलनी, देवराव बाबा चाळ, मलकापूर रोडवरील अंबिका नगर, जुने शहरातील पार्वती नगरसारख्या उच्चभ्रू वस्त्यांमध्ये सुरू असलेल्या या अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई केलेली आहे.कौटुंबिक परिस्थिती, हायफाय शौक पूर्ण करण्यासाठी मजबुरी तसेच ब्लॅकमेलिंग या विविध कारणांमुळे वेश्या व्यवसायात ओढल्या गेलेल्या युवतींवर दबाव टाकून हा व्यवसाय करण्यात येत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मलकापूर रोडवरील अंबिका नगरमध्ये एका शिक्षकाच्या घरातच सुरू असलेल्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला होता. त्यानंतर येवता येथील एका घरात असलेल्या दोन युवती या नागपूर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले असून, तेथील एजंटद्वारे त्यांना अकोल्यात पाठविण्यात आले होते, तर जठारपेठेतील ज्योती नगरातील कुंटणखान्यामध्ये तीन युवतींना ताब्यात घेण्यात आले होते. यासोबतच समता कॉलनीत एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या कुंटणखान्यातील तीन महिला केवळ कौटुंबिक परिस्थिती व उदरनिर्वाहासाठी या व्यवसायात ओढल्या गेल्याची माहिती आहे. डाबकी रोडवर आढळलेली पीडित युवती मात्र शौकाखातर या व्यवसायात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. देवराव बाबा चाळीमध्ये एका घरातून अटक केलेल्या दोन मुलीही केवळ त्यांचे व्यसन पूर्ण करण्यासाठी या धंद्यात उतरल्या होत्या. मोठी उमरीतील इंजिनिअरिंग कॉलनीत सुरू असलेल्या कुंटणखान्यावर तर थक्क करणारी माहिती समोर आली असून, या ठिकाणावर महाविद्यालयातील तरुणीच मोठ्या प्रमाणात सहभागी असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. त्यानंतर विशेष पथकाने बलोदे ले-आउटमधील आरोग्य नगरमध्ये केलेल्या कारवाईत तीन मुली व महिला या कुटुंबाचा उदरनिर्वाह तसेच वैयक्तिक आयुष्य मजेत जगण्यासाठी हा व्यवसाय करीत असल्याची माहिती उघड झाली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी