शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला वाहतूक शाखेकडून १0२ ऑटोंवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 00:07 IST

अकोला: उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून ग्रामीण परिसराचा प्रवासी वाहतुकीचा परवाना असताना अकोला शहरात प्रवासी वाहतूक करीत असलेल्या १0२ ऑटोंवर वाहतूक शाखेकडून गुरुवारी कारवाई करण्यात आली. या ऑटोचालकांकडून तब्बल ८0 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देग्रामीण परिसराचा परवाना असताना अकोला शहरात प्रवासी वाहतूक ऑटोचालकांकडून ८0 हजार रुपयांचा दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून ग्रामीण परिसराचा प्रवासी वाहतुकीचा परवाना असताना अकोला शहरात प्रवासी वाहतूक करीत असलेल्या १0२ ऑटोंवर वाहतूक शाखेकडून गुरुवारी कारवाई करण्यात आली. या ऑटोचालकांकडून तब्बल ८0 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील यांनी शहरातील बेशिस्त वाहतुकीला ताळय़ावर आणण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. यामध्ये गत रविवारी ऑटोचालकांची बैठक घेऊन त्यांना सुरक्षित वाहतुकीचे धडे देण्यात आले. सोबतच वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले; मात्र त्यानंतरही शहरातील ऑटोचालक बेशिस्त धुडगूस घालीत असल्याचे वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी गुरुवारी सकाळीच ऑटोंची तपासणी सुरू केली. यामध्ये  खासगी ऑटो, ग्रामीण परिसराचा परवाना असलेले ऑटो शहरात अवैध प्रवासी वाहतूक करीत असल्याचे उघड झाले. त्यानंतर या वाहन चालकांविरुद्ध मोटार वाहन चालक कायद्यानुसार कारवाई करण्यात आलेली आहे. वाहतूक शाखेने १0२ वाहनचालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई केलेली आहे. या दंडात्मक कारवाईमधून ७२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ऑटोचालकांसह सर्वच वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखा प्रमुख विलास पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे. 

टॅग्स :Akola cityअकोला शहर