शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात २३४ शेतकरी आढळले तीव्र मानसिक तणावग्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 14:17 IST

अकोला : प्रेरणा प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांचे समुपदेशन व आरोग्य सेवा कार्यक्रमात जिल्ह्यात मार्चअखेर गत वर्षभराच्या कालावधीत २ लाख ९ हजार ९४६ शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यामध्ये २३४ शेतकरी तीव्र मानसिक तणावग्रस्त आढळून आले.

ठळक मुद्देगत वर्षभरात आरोग्य विभागामार्फत २ लाख ९ हजार ९४६ शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. गत वर्षभरात जिल्ह्यात २३४ शेतकरी मानसिकदृष्ट्या तीव्र तणावात आढळून आले.२३४ शेतकºयांवर अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या विशेष वैद्यकीय कक्षात उपचार करण्यात आले.

 - संतोष येलकर

अकोला : प्रेरणा प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांचे समुपदेशन व आरोग्य सेवा कार्यक्रमात जिल्ह्यात मार्चअखेर गत वर्षभराच्या कालावधीत २ लाख ९ हजार ९४६ शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यामध्ये २३४ शेतकरी तीव्र मानसिक तणावग्रस्त आढळून आले.शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनामार्फत प्रेरणा प्रकल्पांतर्गत शेतकºयांचे समुपदेशन व आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात गत वर्षभरात आरोग्य विभागामार्फत २ लाख ९ हजार ९४६ शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. त्यानुसार गत वर्षभरात जिल्ह्यात २३४ शेतकरी मानसिकदृष्ट्या तीव्र तणावात आढळून आले. मानसिकदृष्ट्या तीव्र तणावात आढळून आलेल्या २३४ शेतकºयांवर अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्थापन करण्यात आलेल्या विशेष वैद्यकीय कक्षात उपचार करण्यात आले.१७६ शेतकऱ्यांचे समुपदेशन!प्रेरणा प्रकल्पांतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात १७६ शेतकरी सौम्य स्वरूपात मानसिक तणावात असल्याचे आढळून आले. सौम्य तणावात आढळून आलेल्या संबंधित शेतकºयांचे आरोग्य यंत्रणांमार्फत समुपदेशन (कौन्सिलिंग) करण्यात आले.मध्यम स्वरूपात तणावग्रस्त ४४३ शेतकऱ्यांवर औषधोपचार!सर्वेक्षणात जिल्ह्यातील सातही तालुक्यांत ४४३ शेतकरी मध्यम स्वरूपात मानसिक तणावात असल्याचे आढळून आले. मध्यम स्वरूपात तणावग्रस्त आढळून आलेल्या शेतकºयांवर आरोग्य यंत्रणांमार्फत औषधोपचार करण्यात आले.सर्वेक्षणात असे आढळले तणावग्रस्त शेतकरी!सौम्य तणावग्रस्त :   १७६मध्यम तणावग्रस्त :  ४४३तीव्र तणावग्रस्त :      २३४........................................एकूण :                      ८५३प्रेरणा प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात आशा स्वयंसेविकांमार्फत २ लाख ९ हजार ९४६ शेतकरी कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये २३४ शेतकरी मानसिकदृष्ट्या तीव्र मानसिक तणावग्रस्त असल्याचे आढळून आले. या तणावग्रस्त शेतकºयांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विशेष कक्षात उपचार करण्यात आले.-डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी