शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

ऑल इंडिया फुटबॉल टुर्नामेंटवर अकोल्याची मोहोर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 21:11 IST

अकोला: राजस्थान बांदीकुई येथे झालेल्या ऑल इंडिया फुटबॉल टुर्नामेंटवर अकोल्याने विजयाची मोहोर उमटविली आहे. शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात अकोल्याच्या चमूने डीडीए दिल्ली संघाला ३-0 ने पराभूत करून ऑल इंडिया फुटबॉल टुर्नामेंट जिंकली.

ठळक मुद्देअंतिम सामन्यात दिल्लीला हरविले ३-0 ने मिळविला विजय

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राजस्थान बांदीकुई येथे झालेल्या ऑल इंडिया फुटबॉल टुर्नामेंटवर अकोल्याने विजयाची मोहोर उमटविली आहे. शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात अकोल्याच्या चमूने डीडीए दिल्ली संघाला ३-0 ने पराभूत करून ऑल इंडिया फुटबॉल टुर्नामेंट जिंकली.बांदीकुई फुटबॉल क्लब यांच्यावतीने आयोजित ऑल इंडिया फुटबॉल टुर्नामेंटचा अंतिम सामना शमा युनाइटेड अकोला-महाराष्ट्र व डीडीए दिल्ली या संघामध्ये झाला. सामन्याच्या पूर्वार्धात अकोला टीमच्या प्रिन्सने डोक्याने गोल करून अकोल्याला १-0 अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी मोडून काढण्यासाठी दिल्लीच्या संघाने कडवी झुंज दिली; मात्र अकोल्याच्या कादरने गोल करून अकोल्याचे वर्चस्व कायम ठेवले. सामन्याच्या उत्तरार्धात अकोल्याच्या प्रिन्सने पुन्हा एकदा गोल करून ३-0 अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी मोडून काढण्यात दिल्लीच्या संघाला अपयश आल्याने ऑल इंडिया फुटबॉल टुर्नामेंटवर अकोल्याने आपली मोहोर उमटविली. 

अकोल्याच्या संघात कॅप्टन मुदस्सीर अली, शोयब खान, शे. फिरोज गवळी, वसीम शेख, नदीम कुरेशी यांच्यासह नागपूरचा शाहरूख खान, अमरावतीचा जावेद खान, पुसदचा अस्लम खान, मुंबईचा प्रिन्स यांचा समावेश होता. अकोला यंग बॉइज महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक शे. गनी यांच्या मार्गदर्शनात व इलयास खान यांच्या संघ व्यवस्थापनात चमूने यश मिळविले. या चमूचे अकोला रेल्वेस्थानकावर सोमवारी मोठय़ा उत्साहात स्वागत करण्यात आले. या चमूचे फुटबॉल असोशिएशनचे मोहम्मद शे. जावेद अली, अस्लम खान, इलयास खान, गुम्मा चौधरी, दिलीप बिसेन, नकीर खान, सलीम सदर, मोईन खान, मेहबूब खान मो. इरफान आदींनी कौतुक केले. 

टॅग्स :Akola cityअकोला शहरSportsक्रीडाFootballफुटबॉल