शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात विषारी अमोनियाची गळती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 03:40 IST

अकोला : तहसील कार्यालयासमोरील महापालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समधील एका आॅफसेटच्या दुकानात विषारी वायूची गळती झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.

ठळक मुद्देडोळ्यांची जळजळ; १० मिनिटात दुकाने बंद

सचिन राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : तहसील कार्यालयासमोरील महापालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समधील एका आॅफसेटच्या दुकानात विषारी वायूची गळती झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या वायुगळतीमुळे डोळ्यांची जळजळ होणे, अंधुक दिसण्यासारखे प्रकार घडले, तर काही व्यापाºयांचे अंग सुजल्याने बंद करण्यात आले. या गंभीर घटनेची माहिती रात्री ९ वाजेपर्यंत कोणत्याही प्रशासनाला नव्हती.महापालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये प्रकाश आॅफसेट अ‍ॅण्ड प्रिंटिंगचे कार्यालय आहे. विविध प्रकारचे फ्लेक्स येथे तयार करण्यात येतात.फ्लेक्स प्रिंटिंगसाठी अमोनियासह विविध प्रकारच्या घातक रसायनांचा वापर करण्यात येतो. बुधवारी सायंकाळी येथे वायुगळती सुरू झाली आणि काही क्षणांतच संपूर्ण व्यापारी संकुलातील व्यापाºयांचे व त्यांच्या कामगारांसह ग्राहकांचे डोळे सुजणे, अंधुक दिसण्याचा प्रकार घडला, तर काही व्यापाºयांचे अंगाला सूज आली. संकुलातील एका डॉक्टरकडे सर्वांनी धाव घेतली, तर संबंधित डॉक्टरलाही हाच त्रास झाला.त्यामुळे ५ ते १० मिनिटांतच महापालिकेच्या व्यापारी संकुलामधील तब्बल ३४ प्रतिष्ठाने तातडीने बंद करण्यात आली. या घटनेची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाला रात्री उशिरापर्यंत नव्हती, त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.ब्ल्यू प्रिंट काढण्यासाठी अमोनिया हे रसायन वापरले जाते. बुधवारी सायंकाळी अमोनियाचे वेस्टेज केमिकल चुकीने उघडले गेले व जास्त प्रमाणात बाहेर पडल्यामुळे व्यापाºयांना डोळ्यांचा किरकोळ त्रास झाला; मात्र यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात आली.-कल्पेश अग्रवाल, व्यावसायीकव्यापारी संकुलातील एका दुकानातून वायुगळती झाल्याने डोळ्यांना जळजळ होण्याचा त्रास झाला. अंग खाजवण्याचाही त्रास झाल्याने आम्ही प्रतिष्ठान बुधवारी तातडीने बंद केले. काही साहित्य बाहेर राहिल्याने रात्री पुन्हा येऊन हे साहित्य ठेवण्यात आले.- दीपक अग्रवाल, व्यावसायीकडोळ्याला जळजळ होण्याचा व अंधुक दिसण्याचा त्रास झाला. अंगावर खाज सुटल्यासारखे झाल्याने तसेच वायुची दुर्गंधी प्रचंड असल्यामुळे प्रतिष्ठान तातडीने बंद केले.- मनोज गोस्वामी, व्यावसायीकअमोनियाच्या रसायनाची गळती झाल्याने डोळे लाल होणे, डोळ्याला खाज सुटणे, डोळे सुजणे, ड्रायनेस यासारखे गंभीर परिणाम होऊ शकतात; मात्र गळती झाल्यानंतर काही तासांच्या आतच डोळे थंड पाण्याने धुतल्यानंतर त्रास कमी होतो. जास्त प्रमाणात गळती झाल्यास नजरेला धोका निर्माण होऊ शकतो.- डॉ. जुगलकिशोर चिराणिया,नेत्ररोग तज्ज्ञ, अकोला.-