शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला महापालिकेपुढे ७३ कोटींच्या कर वसुलीचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 15:05 IST

अकोला : अकोला महापालिका प्रशासनापुढे मार्च अखेरपर्यंत ७३ कोटी वसुलीचे उद्दिष्ट असून, दोन महिन्यांत ते कसे पूर्ण होईल, या चिंतेत महापालिका कर्मचारी आहेत. १०३ कोटींच्या थकीत वसुलीपैकी केवळ ३० कोटी रुपये वसूल करण्यात मनपा प्रशासनाला यश आले आहे.

अकोला : अकोला महापालिका प्रशासनापुढे मार्च अखेरपर्यंत ७३ कोटी वसुलीचे उद्दिष्ट असून, दोन महिन्यांत ते कसे पूर्ण होईल, या चिंतेत महापालिका कर्मचारी आहेत. १०३ कोटींच्या थकीत वसुलीपैकी केवळ ३० कोटी रुपये वसूल करण्यात मनपा प्रशासनाला यश आले आहे. त्यामुळे दोन महिन्यांत ही आकडेवारी कितीवर पोहोचते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, २१ डिसेंबरपासून २० जानेवारीपर्यंत महापालिकेने शास्ती अभय योजना राबविली. या योजनेचा रविवारी शेवटचा दिवस असल्याने महापालिकेचा कर विभाग चारही झोनमध्ये सुरू राहणार आहे.अकोला महानगरातील नागरिकांकडे करापोटी १०३,८२,२९,३८७ थकीत आहे. या वसुलीसाठी महापालिकेचा कर विभाग सातत्याने परिश्रम घेत आहे. अकोला पूर्व झोनने ४२.९६ टक्के, पश्चिम झोनने २०.४९ टक्के, उत्तर झोनने २१.१५ टक्के, दक्षिण झोनने २७.९४ टक्के कर वसुली केली. चारही झोनची एकूण रक्कम ३०,०१,६५,४३४ वसूल झाली आहे. आता महापालिका प्रशासनाला ७३,८०,६३,९५३ रुपयांचा कर मार्च अखेरपर्यंत वसूल करायचा आहे. महापालिका कर विभागाची टीम आता कर वसुलीसाठी मोहीम उघडत आहे. जानेवारी महिना पूर्णपणे प्रशासनाच्या हातून गेल्याने आता दोन महिन्यांच्या वसुलीवर लक्ष कें द्रित झाले आहे.*शास्ती अभय योजनेचा शेवटचा दिवसमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या करधन नियम ८ कलम ५१ अन्वये शास्ती माफीसाठी मनपातर्फे २१ डिसेंबर १८ ते २० जानेवारी १९ पर्यंत अभय योजना सुरू करण्यात आली होती. रविवारी या योजनेचा शेवटचा दिवस असून, नागरिकांनी थकीत मालमत्ता कर भरणा करावा, रविवारी महापालिकेतील चारही झोनचे कर विभागाचे कार्यालय सुरू राहणार आहे. नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी केले आहे. वसुलीचे उद्दिष्ट कठीण असले तरी महापालिकेची यंत्रणा कर वसुलीसाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे. मार्च अखेरपर्यंत मोठा पल्ला आम्ही गाठल्याशिवाय राहणार नाही.-विजय पारतवार,कर अधीक्षक, मनपा, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका