शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
3
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
4
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
5
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
6
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
7
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
8
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
9
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
10
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
11
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
12
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
13
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
14
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
15
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
16
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
17
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
18
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
19
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
20
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र

अँसिड हल्ल्याची धमकी; पोलिसांचे लोटांगण

By admin | Updated: June 27, 2014 01:33 IST

अकोला शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत अडथळा : ठाणेदारांनीच दिली एक दिवसाची मुदत.

अकोला- काश्मीर लॉजजवळील अवैध पानपट्टी तोडण्यासाठी गेलेल्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला काही युवकांनी धमकी दिल्याने गुरुवारी मोहीम थांबवावी लागली. या ठिकाणी एका युवकाने अँसिड फेकण्याची धमकी दिल्याने पोलिस अधिकार्‍यांनी जमावापुढे लोटांगण घातले. अतिक्रमणधारकांच्या दबावाला बळी पडत पोलिसांनी पानपट्टीधारकास दस्तऐवज सादर करण्यासाठी मुदत दिली. कायद्याचे धिंडवडे काढणारी आणि पोलिसांच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण करणारी घटना रामदासपेठचे ठाणेदार विनोद ठाकरे, सिटी कोतवालीचे अनिरुद्ध अढाव, सिव्हिल लाईन्सचे प्रकाश सावकर आणि खदानचे सी.टी. इंगळे हे चार अधिकार्‍यांच्या उपस्थितीत घडली, हे येथे उल्लेखनीय. अतिक्रमण निर्मूलन पथक गुरुवारी ५ वाजताच्या सुमारास काश्मीर लॉजनजीक पोहोचले. या ठिकाणी वहिद खानच्या वेलकम पान सेंटरच्या समोर असलेले टिनाचे शेड हटविण्यास सुरुवात केली. मात्र, तेवढय़ात काही युवकांनी स्वत:च टीन हटविण्यास प्रारंभ केला. उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी जेसीबीच्या चालकाला अवैध शेड तोडण्यास सांगितले. मात्र काही युवक कारवाईला विरोध करीत शेडवरच चढले. पोलिसांनी मध्यस्थी केली. त्यानंतर या युवकांनी स्वत:च संपूर्ण टीनशेड हटविले. या कारवाईनंतर उपायुक्त चिंचोलीकर यांनी वेलकम पान सेंटर तोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे एका युवकाने अँसिड हल्ल्याची धमकी दिली. काहींनी तर थेट ह्यमाहोल बिघड जायेंगाह्ण अशी पोलिसांनाच धमकी दिली. पाहता-पाहता जवळपास १00 युवक तेथे जमा झाले. एरव्ही सामान्य नागरिकांवर कायद्याचा बगडा उगारणार्‍या पोलिस अधिकार्‍यांनी गुंडांसमोर लोटांगण घालत मध्यस्थी करण्यास सुरुवात केली. ठाणेदार विनोद ठाकरे व अनिरुद्ध अढाव यांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांशी मोबाईल फोनवरून संपर्क साधला. वरिष्ठांशी बोलणे झाल्यानंतर ठाणेदारांनी उपायुक्त दयाराम चिंचोलीकर यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर ठाणेदारांनी पानपट्टीधारक वहिदला शुक्रवारी दस्तऐवज सादर करण्यास सांगितले. अन्यथा शनिवारी बांधकाम तोडण्यात येईल, असेही पोलिसांनी त्याला बजावले. त्यामुळे मोहीम थांबविण्यात आली.