शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

महाबीज घोटाळय़ातील आरोपी कारागृहात

By admin | Updated: March 28, 2016 01:37 IST

शेतक-यांना भरपाईपोटी देण्यात आलेल्या रकमेत हेराफेरी केल्याचा आरोप.

अकोला: महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) कंपनीकडून शेतकर्‍यांनी खरेदी केलेले सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारी शेतकर्‍यांनी केल्यानंतर, त्यांना नुकसानभरपाईपोटी देण्यात आलेल्या ७0 लाख रुपयांच्या रकमेमध्ये हेराफेरी करणाच्या प्रकरणामध्ये सहभाग असलेला आरोपी प्रभाकर तराळे यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश रविवारी दिले आहेत. महाबीजकडून गतवर्षी राज्यातील हजारो शेतकर्‍यांनी सोयाबीनचे बियाणे खरेदी केले होते. यामध्ये राज्यातील २८६ शेतकर्‍यांनी महाबीजकडून खरेदी केलेले सोयाबीन बियाणे केवळ ५ ते १0 टक्केच उगवल्याने शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे राज्यातील विविध भागाच्या शेतकर्‍यांनी सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी महाबीजकडे केल्या होत्या. यावरून महाबीजच्या अधिकार्‍यांसोबतच पंचायत समितीच्या कृषी अधिकार्‍यांनीही या शेतीची पाहणी करून उगवणक्षमता योग्य असताना ८0 ते ९0 टक्के बियाणे न उगवल्याचा अहवाल दिला होता. या अहवालानंतर महाबीजने राज्यातील २८६ शेतकर्‍यांना ७0 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया सुरू केली. यामधील ६३ लाख रुपयांची नुकसानभरपाई वाटप करण्यात आली असून, यामध्ये मोठा घोळ झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी क्षेत्र अधिकारी दिलीप नानासाहेब देशमुख याच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. देशमुखच्या सांगण्यावरूनच महाबीज कर्मचारी पतसंस्थेचा लिपिक प्रभाकर तराळे यानेही रेकॉर्डमध्ये घोळ केल्याचे पोलीस तपासात समोर आल्यावर गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात आली. आरोपीला न्यायालयाने रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी संपल्याने न्यायालयाने आरोपीची कारागृहात रवानगी केली.