शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

हुंडीवाले हत्याकांडातील आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 15:06 IST

सूरज गावडेंचा जामीन अर्ज मागे घ्यावा किंवा तो फेटाळण्यात येईल, अशा सूचना करताच आरोपींच्या वकिलांनी जामीन अर्ज मागे घेतला.

अकोला : अखिल भारतीय गवळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक किसनराव हुंडीवाले यांच्या हत्याकांड प्रकरणातील आरोपी सूरज प्रल्हाद गावंडे याचा जामीन अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर आरोपीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेताच खंडपीठाने आरोपी सूरज गावडेंचा जामीन अर्ज मागे घ्यावा किंवा तो फेटाळण्यात येईल, अशा सूचना करताच आरोपींच्या वकिलांनी जामीन अर्ज मागे घेतला.स्वामी विवेकानंद राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ, कौलखेड या शैक्षणिक संस्थेतील सभासदांच्या निवड प्रक्रियेचा वाद २०१४ पासून सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात सुरू आहे. याच वादाच्या प्रकरणात सोमवार, ६ मे रोजी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान किसनराव हुंडीवाले न्यास नोंदणी कार्यालयात त्यांचा मुलगा प्रवीण यांच्यासोबत उपस्थित असताना भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम ऊर्फ छोटू श्रीराम गावंडे, रणजित श्रीराम गावंडे, प्रवीण श्रीराम गावंडे, धीरज प्रल्हाद गावंडे, सूरज प्रल्हाद गावंडे, श्रीराम कसदन गावंडे, सतीश सुखदेव तायडे, विशाल सुखदेव तायडे, मयूर गणेशलाल अहिरे, दिनेश ठाकूर, प्रतीक दत्तात्रय तोंडे, मंगेश श्रीकृष्ण गावंडे व मोहम्मद साबीर यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात येऊन किसनराव हुंडीवाले यांची हत्या केली होती. या प्रकरणातील आरोपी मोहम्मद साबीर हा फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. तर श्रीराम कसदन गावंडे या आरोपीस तब्बल एक वर्षापर्यंत न्यायालयासमोर जामीन अर्ज करण्यास मनाई केली आहे. तर आता नागपूर खंडपीठात सूरज प्रल्हाद गावंडे या आरोपीला जामीन देण्यात यावा यासाठी अ‍ॅड. अनिल मार्डीकर यांनी अर्ज दाखल केला होता; मात्र सरकार पक्षाचे वकील अ‍ॅड. व्ही. ए. ठाकरे यांनी युक्तिवाद केल्यानंतर नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्तींनी सदरचा अर्ज मागे घ्यावा किंवा तो फेटाळण्यात येईल, अशी सूचना करताच आरोपीच्या वकिलांनी सूरज गावंडे याचा जामीन अर्ज मागे घेतला.

 

टॅग्स :Kisanrao Hundiwale Murder Caseकिसनराव हुंडीवाले हत्याकांडAkolaअकोला