शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बसमधून ८० लाखांची रोकड नेणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या!

By नितिन गव्हाळे | Updated: December 2, 2023 18:46 IST

मुंबईला नेण्यात येत हाेती रोकड, स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कामगिरी.

नितीन गव्हाळे, अकोला: व्यापाराशी संबधित ८० लाख रूपयांची रोकड पातूर येथील ढाब्यावर उभ्या असलेल्या लक्झरी बसगाडीतून लंपास करणाऱ्या आंतरराज्यीत टोळीतील एका आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी मुसक्या आवळून ७९ लाखांची रोकड हस्तगत केली आहे. २६ नोव्हेंबर रोजी ही रात्री ही घटना घडली होती.

राजापेठ अमरावती येथील राजु वेलाजी प्रजापती(२६) यांच्या तक्रारीनुसार ते व्यापाराशी संबधित ८० लाख रूपयांची रोकड घेऊन खाजगी लक्झरी बसगाडीने अकोलामार्गे मुंबईला जात होते. दरम्यान लक्झरी बस पातुरातील क्वालिटी ढाब्याजवळ थांबली होती. राजु प्रजापती हे शौचासाठी खाली उतरले असता, अज्ञात चोरट्याने ८० लाख रूपये असलेली बॅग लंपास केली होती. या प्रकरणात पातूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य पाहता, पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकरराव शेळके यांच्या मार्गदर्शनात एपीआय कैलास डी. भगत, पीएसआय गोपाल जाधव यांनी गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी मध्यप्रदेश येथे रवाना होवून त्यांनी ग्राम खेखा ता मनवार जि. धार येथील आरोपी विनोद विश्राम चव्हाण(१९) रा. लुन्हेरा बुजूर्ग ता. मनावर जि.धार यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या राहते घरातुन रोखरक्कम ७९ लाख रूपये जप्त केले. त्याचा साथीदार रहेमान उर्फ पवली गफुर खान हा मात्र फरार होण्यात यशस्वी झाला.यांनी परत आणली रोकड

पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलिस अधीक्षक अभय डाेंगरे यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे कर्मचारी गणेश पांडे, राजपालसिंग ठाकुर, रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये, अब्दुल माजीद, विशाल मोरे, एजाज अहेमद, वसीमोद्दीन शेख, अविनाश पाचपोर, भिमराव दिपके, स्वप्नील चौधरी, राहुल गायकवाड, अन्सार शेख, मोहम्मद आमीर, लिलाधर खंडारे, खुशाल नेमाडे, अक्षय बोबडे, प्रविण कश्यप, प्रशांत कमलाकर, अनिल राठोड यांनी आरोपींचा माग काढत, ७९ लाखांची रोकड आरोपीकडून हस्तगत केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी