शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी बनावटीच्या दोन पिस्तूलसह आरोपी गजाआड

By admin | Updated: July 7, 2017 01:46 IST

गुन्हे शाखेची शिवणीत कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विदेशी बनावटीच्या दोन पिस्तूल-काडतूसांसह जगदीश विश्वनाथ माने (४०) या आरोपीस गुरुवारी गजाआड करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई शिवणी परिसरात दुपारी केली. या कारवाईमुळे अकोला शहरात शस्त्र विक्रीची टोळी कार्यरत असल्याची शक्यता वर्तविली जात असून, त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू झाला आहे.एक इसम विदेशी बनावटीच्या पिस्तूलची विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिवणीच्या उड्डाणपुलाजवळ सापळा रचला. मिळालेल्या माहितीच्या वर्णनाच्या इसमाला अडवून त्यास शिताफीने ताब्यात घेण्यात आले. अंगझडतीत त्याच्याजवळून विदेशी बनावटीच्या दोन पिस्तूल आढळल्या. सोबतच दोन जिवंत काडतूसही जप्त करण्यात आल्या. दहा हजार रुपये किमतीच्या या मुद्देमालासह आरोपी जगदीश विश्वनाथ माने (४०) रा. कैकाडीपुरा धोबी खदान याच्यावर ३,२५ आर्मअ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. माने याने आतापर्यंत किती लोकांना शहरात पिस्तूल विकल्यात आणि तो आणतो कुठून, त्याचे सहकारी किती आहेत, याचा छडा पोलिसांसाठी आव्हान ठरणार आहे. अकोल्यात शस्त्रविक्री करणारी मोठी टोळी असण्याची शक्यता यातून अधोरेखित होते; मात्र पोलिसांकडून केवळ पिस्तूल, काडतूस आणि आरोपींना पकडले जाते, त्यापलीकडे तपास जात नाही. या कारवाईचे पुढे काय होते, याकडे आता अकोलेकरांचे लक्ष लागून आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, विजयकांत सागर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक कैलास नागरे, चंद्रकांत ममताबादे यांच्या मार्गदर्शनात अशोक चाटी, शेख हसन, अ. माजिद, एजाज अहेमद यांनी केली.