शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जीआरपी पोलीस ठाण्यातून फरार झालेल्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 10:40 IST

अकोला जीआरपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्यानंतर पोलिसांनी रविवारी उइके याच्याविरुद्ध लैंगिक छळ तसेच पॉस्को अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : रेल्वे स्टेशन तसेच रेल्वेमध्ये भीक मागण्यातून ओळखी झालेल्या एका १४ वर्षीय अल्पवयीन चिमुकलीला विविध आमिष देऊन तिला गर्भवती करणारा वर्धा जिल्ह्यातील सुधाकर उइके नामक आरोपी अकोला जीआरपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्यानंतर पोलिसांनी रविवारी उइके याच्याविरुद्ध लैंगिक छळ तसेच पॉस्को अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.रेल्वे स्टेशन परिसरात शनिवारी रात्री संशयास्पदरीत्या फिरत असलेल्या सुधाकर उइके (३५) रा. वर्धा याच्यासोबत एक अल्पवयीन मुलगी असल्याचे चाइल्ड लाइन सदस्यांना दिसले.यावरून चाइल्ड लाइनने दोघांनाही ताब्यात घेऊन सुधाकर उइके याला जीआरपी पोलिसांच्या ताब्यात दिले. तर अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे समोर आले. तसेच तिचे समुपदेशन करून मुलीकडून माहिती घेतली असता तिचा लैंगिक छळ सुधाकर उइके याने केल्याची माहिती दिली. यावरून पोलिसांनी रविवारी सुधाकर उइके याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ तसेच पॉस्को अ‍ॅक्टच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सुधाकर उइके हा अकोला जीआरपी पोलिसांच्या ताब्यात असतानाच त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येत होती; मात्र दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन तो रविवारी पसार झाला होता. जीआरपी पोलिसांचे विविध पथक फरार झालेल्या उइकेच्या शोधासाठी अकोला-मूर्तिजापूर, अकोला-खामगाव मार्गावरील ढाब्यांवर शोध घेत आहेत; मात्र रविवार रात्री उशिरापर्यंत उइके पोलिसांच्या हातात लागला नाही.

या ठिकाणी केला लैंगिक छळअल्पवयीन मुुलगी ही अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे. तर फरार झालेला सुधाकर उइके हा वर्धा येथील रहिवासी आहे. ही मुलगी रेल्वेमध्ये भीक मागायचे काम करायची तर उइके हा देखील रेल्वेमध्ये भीक मागायचा. यामधूनच दोघांची ओळख झाली आणि उइके हा मुलीला घेऊन बुलडाणा जिल्ह्यात राहू लागला. या ठिकाणीच त्याने मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्याने मुलीला गर्भवती केल्याची माहिती आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी