खामगाव (जि. बुलडाणा), दि. २९ : येथील अकोला बायपासवर गोंधनापूर येथील श्रीकृष्ण जगन सरदार यास एका अज्ञात वाहनाने धडक दिली. सरदार यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. खामगाव तालुक्यातील गोंधनापूर येथील रहिवासी श्रीकृष्ण जगन सरदार (वय २७) हे अकोला बायपासवर रस्त्याच्याकडेने पायी चालले होते. त्यावेळी मागून येणार्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. ही धडक एवढी जबर होती की सरदार यांचा जागीच मृत्यु झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सरदार यांचा मृतदेह ताब्यात घेतला व छवविच्छेदनासाठी पाठविला. याप्रकरणी रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.
खामगाव येथे अपघात; एक ठार
By admin | Updated: August 30, 2016 01:19 IST