अकोला - पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एएसआय दमयंती वर्मा यांचा रविवारी बुलडाणा जिल्हय़ात एका अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या भावासोबत साखरखेर्डा येथे विवाहासाठी जात असताना गतिरोधकावर दुचाकीला झटका बसल्याने दमयंती वर्मा रोडवर कोसळल्या. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ अकोल्यातील एका मोठय़ा खासगी हॉस्पीटलमध्ये हलविण्यात आले, मात्र काही वेळातच येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दमयंती वर्मा यांची चार ते पाच वर्षाने सेवानवृत्ती होती.
महिला पोलीस अधिका-याचा अपघाती मृत्यू
By admin | Updated: May 11, 2015 02:28 IST