शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

टोइंग पथकाला अकोला बसस्थानक परिसरात प्रवेशबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 16:19 IST

अकोला: वाहने उचलून नेणाऱ्या टोइंग पथकाने मध्यवर्ती बसस्थानक परिसरात कारवाई करू नये, असा गर्भित इशारा मध्यवर्ती बसस्थानक क्रमांक दोनचे आगार प्रमुुख अरविंद पिसोडे यांनी दिला आहे.

अकोला: वाहने उचलून नेणाऱ्या टोइंग पथकाने मध्यवर्ती बसस्थानक परिसरात कारवाई करू नये, असा गर्भित इशारा मध्यवर्ती बसस्थानक क्रमांक दोनचे आगार प्रमुुख अरविंद पिसोडे यांनी दिला आहे. त्यामुळे आता टोइंग पथकाला बसस्थानक परिसरात प्रवेशबंदी झाली आहे.शिस्त लावण्याच्या नावाखाली अकोला महापालिका आणि शहर वाहतूक पोलीस शाखेच्या वतीने महानगरातील प्रमुख मार्गांवरील दुचाकी वाहने उचलून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. टोइंग पथकाच्या कारवाईत वाहतूक शिस्त कमी आणि दंड वसुलीवरच जास्त होत असल्याने अकोलेकर त्रासले आहे. शहरातील प्रमुख मार्गावर कारवाई करीत असताना, हे टोइंग पथक बसस्थानक आणि रेल्वे स्थानक परिसरातील वाहनेही उचलून आणत आहे. नातेवाईक आणि कुटुंबीयांना सोडण्यासाठी अकोलेकर बसस्थानकावर येतात. गाडी ठेवून जात नाही तोच गाडीवर नजर ठेवून असलेले टोइंग पथक येथून गाड्या उचलतात. नंतर गाडी सोडविण्यासाठी दोनशे रुपयांचा दंड या टोइंग पथकाला द्यावा लागतो. या कारवाईमुळे बसस्थानक आणि रेल्वेस्थानक परिसरात येणाºयांना हकनाक हजारो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागतो आहे. या कारवाईला अकोलेकर त्रासले असून, टोइंग पथकाच्या या कारवाईवर रेल्वे प्रशासन आणि बसस्थानक प्रशासनाने अंकुश लावावा, अशी मागणी वाढली आहे. प्रवाशांच्या या तक्रारींची गंभीर दखल घेत टोइंग पथकाला बसस्थानक परिसरात प्रदेशबंदी करण्यात आली आहे.

  बसस्थानकावर वाहने घेऊन येणारे व्यक्ती आमचे ग्राहक आहेत. त्यांची वाहने अशी जर उचलून नेली जात असतील तर त्याचा वाईट परिणाम समोर येईल. त्यामुळे टोइंग पथकाला प्रवेशबंदी करण्यात आली आहे.- अरविंद पिसोडे, आगार व्यवस्थापक, अकोला डेपो क्रमांक दोन- बसस्थानक आगार प्रमुखांच्या आदेशान्वयेच आम्ही त्यांच्या परिसरात शिरून वाहने उचलण्याची कारवाई करीत होतो. त्यांना आता कारवाई न करण्याचे सुचविल्याने आम्ही त्यांच्या परिसरात कारवाया करणार नाही.- विलास पाटील, शहर वाहतूक निरीक्षक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Bus Standअकोला बस स्थानक