शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सीईटी दिली तरच आरोग्यसेविकांना ‘एएनएम’ला प्रवेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 13:44 IST

आरोग्य सेविकांना आगामी शैक्षणिक सत्रापासून सीईटी परीक्षेत मिळणाºया गुणवत्तेनुसार अभ्यासक्रमात प्रवेश मिळणार आहे.

- प्रवीण खेते  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ग्रामीण आणि दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णसेवा देणाऱ्या आरोग्यसेविकांना आता ‘एएनएम’नर्सिंगच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा देणे बंधनकारक असणार आहे. ‘राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षा’ने या संदर्भात निर्णय घेतला असून, आरोग्य सेविकांना आगामी शैक्षणिक सत्रापासून सीईटी परीक्षेत मिळणाºया गुणवत्तेनुसार अभ्यासक्रमात प्रवेश मिळणार आहे.एएनएम अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत विद्यार्थ्यांना मेरीट लिस्टनुसार प्रवेश दिला जात होता; परंतु नवीन शैक्षणिक सत्रात सीईटी असेल, तरच विद्यार्थ्यांना एएनएम अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जाणार असल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आरोग्य सेविका म्हणून करिअर घडवू इच्छिणाºया विद्यार्थ्यांना आतापासूनच सीईटीची तयारी करावी लागणार आहे.गत वर्षीच राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी) आरोग्य सेविकांसाठी कार्यरत असलेल्या ‘आॅक्झिलरी नर्सिंग मिडवायफरी’ या अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. चालू शैक्षणिक सत्रामध्ये मेरीट लिस्टनुसार विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात आला; मात्र यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार असल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यात एएनएमच्या १८ हजार जागाप्राप्त माहितीनुसार, राज्यात जवळपास ४९३ महाविद्यालयात ‘एएनएम’चा ‘आॅक्झिलरी नर्सिंग मिडवायफरी’ हा अभ्यासक्रम शिकविण्यात येतो. या महाविद्यालयांमध्ये १८ हजार जागा असून, प्रवेशासाठी नवीन शैक्षणिक सत्रापासून सीईटी देणे बंधनकारक असणार आहे.

‘एएनएम’ला व्यावसायिक दर्जागत वर्षी एएनएम अभ्यासक्राला व्यावसायिक दर्जा देण्यात आल्याने या अभ्यासक्रमात प्रवेशसाठी सीईटी देणे अनिवार्य करण्यात आले आहे. कुठल्याही शाखेतून बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर या अभ्यासक्रमात प्रवेश घेता येतो. हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांना कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेविका म्हणून नोकरीची संधी उपलब्ध आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एएनएम अभ्यासक्रमासाठी सीईटी आवश्यक असल्याचा निर्णय गत वर्षी घेण्यात आला होता. त्यानुसार, नवीन शैक्षणिक सत्रापासून त्याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती आहे; मात्र या संदर्भात आधिकारिक स्वरूपात सूचना आलेली नाही.- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्य