शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

माजी महापौरांच्या कौलखेडातील घरासह हॉटेलची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 14:18 IST

अमरावती व अकोला एसीबीने त्यांच्या घरांची व हॉटेलची मंगळवारी पहाटेपर्यंत झाडाझडती घेतली.

अकोला: शहरातील भाजपाच्या पहिल्या महापौर सुमन गावंडे व पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झालेले सहायक पोलीस निरीक्षक त्यांचे पती श्रीराम गावंडेसह त्यांच्या तीन मुलांविरुद्ध अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने (एसीबी) रविवारी रात्री उशिरा बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर अमरावती व अकोला एसीबीने त्यांच्या घरांची व हॉटेलची मंगळवारी पहाटेपर्यंत झाडाझडती घेतली. या दरम्यान अधिकाऱ्यांनी त्यांच्या संपत्तीच्या नोंदी घेऊन पंचनामे केले. गावंडे कुटुंबीयांकडे १ कोटी ५२ लाख २२ हजार ८९४ रुपयांची मालमत्ता बेहिशेबी असल्याचे एसीबीने केलेल्या तपासात समोर आले आहे.सरकार पक्षातर्फे बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाची फिर्याद अमरावती एसीबीचे पोलीस निरीक्षक रवींद्र जेधे यांनी दिली आहे. त्यानुसार एसीबीने श्रीराम कजदन गावंडे यांच्या कुटुंबातील त्यांच्या पत्नी माजी महापौर सुमन श्रीराम गावंडे, मुलगा प्रवीण श्रीराम गावंडे, रणजित श्रीराम गावंडे, विक्रम श्रीराम गावंडे यांच्याविरुद्ध अपसंपदेचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास अकोला एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शरद मेमाने यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यानुसार सोमवारपासून श्रीराम गावंडे यांच्या कौलखेड परिसरातील प्रमोद नगर येथील घराची झडती पोलीस निरीक्षक रवींद्र जेधे यांनी घेतली. त्यांनी घरातील सामान आणि इतर आवश्यक बाबींच्या नोंदी घेऊन पंचनामे केले. तर अकोला एसीबीचे पोलीस निरीक्षक ईश्वर चव्हाण यांनी श्रीराम गावंडे यांचे पोलीस खात्यात असलेले भाऊ श्रीकृष्ण गावंडे यांच्या घराची झडती घेतली. तसेच श्रीराम गावंडे यांच्या मुलाचे बार्शीटाकळी रोडवरील नंदनवन हॉटेलची तपासणी करून पंचनामा केला. आरोपी श्रीराम गावंडे व त्याची मुले सध्या किसनराव हुंडीवाले यांच्या हत्याकांड प्रकरणात कारागृहात आहेत. तर एक मुलगा अद्यापही फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग