अकोला : जिल्हाभरात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून, कधीही अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी उन्हाळी पिके काढून घेण्याची लगबग चालविल्याचे परिसरात दिसून येत आहे.
--
ग्रामीण भागात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर
अकोला : ग्रामीण भागात शौचालये उभारण्यात आली आहेत; मात्र अधिकांश ठिकाणी त्याचा वापरच केला जात नाही. बहुतांश नागरिक आजही उघड्यावरच शाैचास जात आहेत. यामुळे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
---
टरबूज उत्पादक शेतकरी अडचणीत
अकोला : शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीच्या बळावर टरबुजाचे पीक उभे केले. या प्रयोगात जिल्ह्यातील शेतकरी यशस्वी झाले; मात्र शेतमाल काढणीच्या सुमारास कडक निर्बंध लागू असल्याने टरबूज उत्पादकांची कोंडी झाली आहे. बाजारपेठ नसल्याने लाखोंचे पीक सडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
------
शेती मशागतीची कामे पूर्णत्वाकडे
अकोला : जिल्ह्यात शेतात नांगरणीसह इतर शेती मशागतीची कामे जोमात सुरू आहेत; मात्र, डिझेलच्या दरवाढीचा फटका सरळ शेतीच्या मशागतीस बसला असून, याचा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.
---
शेणखताच्या दरात वाढ
अकोला : पशुधन घटत असून, वहितीखालील जमिनीमध्ये वाढ होत आहे. त्यातच यांत्रिकीकरणाचा शेतीमध्ये वाढलेला वापर पाहता शेणखताला मागणी वाढली आहे; मात्र त्या प्रमाणात ते उपलब्ध होत नसल्याने त्याचे भावही वाढले आहेत.
---
ऐन सणासुदीला माठ विक्री बंद
अकोला : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीया सणानिमित्त माठाची मागणी असते. या सणाला माठाला महत्त्व असते; परंतु ऐन सणासुदीच्या काळात कडक निर्बंध असल्याने अनेकांना माठ खरेदी करता आली नाही.
---