शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

अकोल्यात शिवसैनिकाने केला आत्मदहनाचा प्रयत्न

By atul.jaiswal | Updated: February 5, 2024 17:25 IST

आमदार नितीन देशमुख याच्यासह इतर पदाधिकारी व  कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

अकोला : शहरातील तुकाराम चौक ते मलकापूरपर्यंतच्या रस्त्यासाठी गत सात दिवसांपासून सुरु असलेल्या उपोषणाची दखल न घेतल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. अधीक्षक अभियंता यांच्या दालनात चर्चा सुरु असताना माजी नगरसेवक मंगेश काळे यांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. आमदार नितीन देशमुख याच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे पुढील अनर्थ टळला. शिवसैनिक आक्रमक झालेले पाहून अधीक्षक अभियंता यांनी तातडीने रस्त्याचे काम सुरू करण्याचे आदेश दिले.

तुकाराम चौक ते मलकापूर रस्त्याची सात वर्षांपासून दयनीय अवस्था असून यामुळे अनेक अपघात झालेले आहेत. या रस्त्याचे काम करण्यात यावे म्हणून नगरसेवक मंगेश काळे मित्रमंडळाने सोमवारी २९ जानेवारीपासून मंगेश काळे मित्र मंडळ व व निर्भय बनो जन आंदोलनाचे संयोजक गजानन हरणे, प्रमोद धर्माळे, अविनाश मोरे हे उपोषण करीत आहेत. या रस्त्यासह पाइपलाइन दुरुस्ती व स्ट्रीट लाइटची कामे त्वरित पूर्ण व्हावी ही मागणी त्यांनी केली आहे.  बांधकाम विभाग, मनपा आयुक्त, जिल्हा प्रशासन, अधिकारी लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत नसल्यामुळे रविवार, ४ जानेवारी रोजी मलकापूरमध्ये कळकळीत बंदही पाळण्यात आला.

स्थानिक व्यापारी दुकानदार यांनी आपले दुकान प्रतिष्ठान बंद ठेवून सहकार्य केले. सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी आमदार नितीन देशमुख, माजी आमदार संजय कराळे,  जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, माजी नगरसेवक राजेश मिश्रा, राहुल कराळे, मंगेश काळे हे शिवसैनिकांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी गेले. त्यावेळी मंगश काळे यांनी सोबत आणलेली डिझेलची बॉटल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी आमदार नितीन देशमुख याच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

टॅग्स :AkolaअकोलाShiv Senaशिवसेना