शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

राग येऊन घर सोडून गेलेली अल्पवयीन मुलगी जळगाव खान्देशातील बालसुधारगृहात आढळली

By आशीष गावंडे | Updated: May 31, 2024 19:55 IST

अकाेला पाेलिसांनी अकाेट तालुक्यातील मुलीचा लावला शोध

अकाेला -  राग आल्यामुळे घरातून निघून गेलेल्या अकाेट तालुक्यातील एका ११ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा आठ महिन्यानंतर शाेध लावण्यात अनैतिक मानवी वाहतुक कक्षाला यश मिळाले आहे. अकाेला पाेलिसांनी राज्यातील अनेक शहरांत या मुलीचा शाेध घेतल्यानंतर ती जळगाव खान्देश मधील बालसुधारगृहात असल्याची माहिती मिळाली. पाेलिस बालसुधारगृहातून मुलीला ताब्यात घेऊन तीच्या कुटुंबियांसह  शुक्रवारी शहरात दाखल झाले.  

अकाेट तालुक्यातून एक ११ वर्षाची अल्पवयीन मुलगी घरातून निघून गेल्याची तक्रार तीच्या पालकांनी १६ सप्टेंबर २०२३ राेजी अकाेट शहर पाेलिस स्टेशनमध्ये नाेंदवली हाेती. पाेलिसांनी शाेध घेतल्यानंतरही मुलीचा पत्ता लागत नव्हता. अखेर सदर प्रकरण अनैतिक मानवी वाहतुक कक्षाकडे हस्तांतरित करण्यात आले. या कक्षातील पाेलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुंबइ, पुणे, संभाजीनगरसह विविध शहरात शाेध घेतला,परंतु उपयाेग झाला नाही. तपासादरम्यान अल्पवयीन मुलगी ही जळगाव खान्देश येथील बाल सुधारक गृहात असल्याची माहिती गुप्त बातमीदारांकडून मिळाली. त्यामुळे तपास पथकाने जळगाव खान्देशमधील बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांसाेबत संपर्क साधून मुलीबद्दल खातरजमा केली.

मुलीच्या कुटुंबियांनी मुलीला ओळखल्यानंतर पाेलिसांनी बाल कल्याण समिती अध्यक्षांसाेबत रितसर पत्रव्यवहार करुन मुलीला ताब्यात घेतले. मुलीचा शाेध घेण्याची कामगिरी अनैतिक मानवी वाहतुक कक्षाच्या प्रभारी पाेलिस निरीक्षक उज्वला देवकर, ‘एपीआय’ कविता फुसे, ‘पीएसआय’ मनोहर वानखडे, पोहेकॉ सुरज मंगरूळकर, धनराज चव्हाण, प्रदीप उंबरकर, पुनम बचे, अविंद्र खोडे, पुजा चंदन यांनी पार पाडली. 

मुलीचे आई-वडील अशिक्षीत,गरीबमुलीचे पालक हातमजूरी करुन उदरनिर्वाह करतात. ते अशिक्षीत व गरीब असल्यामुळे मुलीचा शाेध कसा घ्यायचा, असा प्रश्न त्यांच्यासमाेर उपस्थित झाला हाेता. अकाेला पाेलिसांनी मुलीचा शाेध घेतल्याचा आनंद त्या पालकांच्या चेहऱ्यावर मावत नव्हता.