शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

विद्युतचे ॲल्युमिनियम तार चोरणारी टोळी गजाआड; चार लाखांचा मुद्देमाल जप्त

By सचिन राऊत | Updated: July 22, 2023 18:56 IST

दहीहंडा व बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत विद्युत वाहिनीचे ॲल्युमिनियमचे तार चोरणाऱ्या टोळीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे.

अकोला : दहीहंडा व बोरगाव मंजू पोलीस स्टेशनच्या हद्दीत विद्युत वाहिनीचे ॲल्युमिनियमचे तार चोरणाऱ्या टोळीला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे. या दोन चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दहीहंडा व बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत विद्युत वाहिनीच्या ॲल्युमिनियम तारची मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याच्या तक्रारी दोन्ही पोलीस ठाण्यात दाखल आहेत. यावरून स्थानिक गुन्हे शाखा व संबंधित पोलिसांनी समांतर तपास सुरू केला असता स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीवरून या चोरीतील एक संषयीत आरोपी अकोट तालुक्यातील आडगाव येथे फिरत असल्याची माहिती मिळाली. यावरून पथकाने मोहम्मद शफी उर्फ शकू चोटा मोहम्मद युनूस यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता या आरोपीने मुर्तीजापुर येथील जुनी वस्ती परिसरातील रहिवासी संघर्ष प्रल्हाद गणवीर याच्या साथीने या दोन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीत विद्युत वाहिनीच्या ॲल्युमिनियम तारची चोरी केल्याची कबुली दिली.

 यावरून दोन्ही आरोपींची आणखी कसून चौकशी केली असता त्यांनी ही विद्युत तार नांदुरा येथील रहिवासी शेख फिरोज शेख निसार याला विकल्याची माहिती दिल्यानंतर  पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले.  त्यांच्याकडून ४२५ किलो विद्युत वाहक अलोमीनियमचा तार तसेच या चोरीसाठी वापरलेली चार चाकी वाहन असा एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीArrestअटक