शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गावरान मेवा, दुर्मिळ भाज्यांचा महोत्सव; शेतकऱ्यांकडून रानभाज्यांची विक्री, अकोलेकराची झुंबड

By रवी दामोदर | Updated: August 13, 2023 13:41 IST

मूर्तिजापूर रस्त्यावरील ‘आत्मा’ कार्यालयाच्या परिसरात रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न झाला.

अकोला : कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेतर्फे (आत्मा) शनिवार, दि.१२ ऑगस्ट रोजी आयोजित जिल्हा रानभाजी महोत्सवात गावरान मेवा, दुर्मिळ भाज्यांचा समावेश असल्याने ते खरेदीसाठी अकोलेकरांची झुंबड उडाल्याचे दिसून आले. मूर्तिजापूर रस्त्यावरील ‘आत्मा’ कार्यालयाच्या परिसरात रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न झाला.

महोत्सवात वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादन कंपनी, शेतकरी गटांमार्फत गावरान मेवा, दुर्मिळ रानभाज्या विक्रीला आणल्या होत्या. यंदा रानभाजी महोत्सवात वेगवेगळ्या रानभाज्यांचे तब्बल ५० स्टॉल होते. महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अमोल मिटकरी यांची उपस्थिती होती. महोत्सवादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांसह पाहुण्यांनी रानभाज्यांच्या स्टाॅलला भेटी देऊन रानभाज्यांविषयी माहिती घेत रानभाज्यांची खरेदी केली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या असता जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे निरसन केले. 

महोत्सवात आमदार अमोल मिटकरी यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे, डीएफओ कुमार स्वामी, ‘आत्मा’चे प्रकल्प उपसंचालक मिलिंद जंजाळ आदींसह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरुणकर यांनी केले, तर आभार प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे यांनी मानले.

५० हजारांची उलाढालनागरिकांना रानभाज्यांची ओळख, आरोग्यविषयक महत्त्व व जनजागृतीसाठी जिल्ह्यात रानभाजी महोत्सव घेण्यात येत असून, त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. शहरात शनिवारी आयोजित महोत्सवात ५० स्टॉलवर नागरिकांनी खरेदीसाठी झुंबड केली होती. ड्रॅगन फ्रुट, फांद्याची भाजी व बेसनाला नागरिकांनी अधिक पसंती दर्शवली. या महोत्सवादरम्यान अवघ्या काही तासातच ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत उलाढाल झाल्याची माहिती आहे.

रानभाजी महोत्सवात या रानमेवांचा समावेशरानभाजी महोत्सवात फांदीची भाजी, गवती चहा, पुदीना, अळूची पाने, करटुले, निवतीची भाजी, हडसन, अंबाडीची भाजी, कढीपत्ता, वाघाटे, चिवळची भाजी, सुरन कंद, केना, आघाटा, तांदुळजीरा, गुळवेल, ड्रॅगन फ्रुट, शेरणी, मुंगरी, तरोटा भाजी, आंबटचुका आदी भाज्यांचा समावेश होता.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी