शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील ९२७ गावांनाही मिळणार दुष्काळी मदत!

By admin | Updated: March 28, 2016 01:31 IST

लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे शासनाने अखेर न्याय दिला असल्याची भावना.

अकोला: जिल्ह्यातील ९२७ गावांना दुष्काळग्रस्त घोषित करावे, अशी मागणी सातत्याने खासदार संजय धोत्रे यांच्यासह जिल्ह्यातील आमदारांनी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर जिल्ह्यातील सर्वच गावांना दुष्काळग्रस्त मदत देण्याचा मार्ग शासनाने मोकळा केला आहे. अकोला जिल्ह्यातील ९२७ गावांपैकी केवळ ५५ गावे दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आली होती. जिल्ह्यातील सर्वच गावांची पैसेवारी सरासरी २ पैसे असतानासुद्धा अकोला जिल्ह्यावर अन्याय होत होता. या संदर्भात जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी सरकारकडे तगादा लावून शेतकर्‍यांच्या व्यथा मांडल्यात. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार रणधीर सावरकर यांनी शासनाचे याकडे लक्ष वेधले होते. अखेर शासनाने अकोला जिल्ह्यातील ९२७ गावांनाही दुष्काळग्रस्त घोषित करून या गावांना दुष्काळी मदत मिळण्याचा मार्ग मोकळा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल व कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांनी जिल्ह्याला न्याय दिला असल्याची भावना आ. सावरकर यांनी व्यक्त केली. शासनाने याच पद्धतीने सिंचन प्रकल्पांसाठी व अनुशेष भरण्यासाठी पश्‍चिम विदर्भाला न्याय द्यावा, अशी अपेक्षा आ. सावरकर यांनी व्यक्त केली.