शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला  जिल्ह्यात ८९ टक्के पोलिओ लसीकरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 12:13 IST

मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १लाख ८२ हजार ७५७ बालकांना लसीकरणाचे उद्दिष्ट होते; पहिल्याच दिवशी ८९ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

अकोला : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत रविवारी शहरी व ग्रामीण भागात ८९ टक्के लसीकरण झाले. जिल्हा स्त्री रुग्णालय येथे केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते बाळाला लसीकरण करून मोहिमेची सुरुवात करण्यात आली.राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेची सुरुवात जिल्हा स्त्री रुग्णालयातून करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुकर राठोड, महेंद्र मोहिते, डॉ. सीमा तायडे व डॉ. इंद्रायणी मिश्रा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १लाख ८२ हजार ७५७ बालकांना लसीकरणाचे उद्दिष्ट होते. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी यातील ८९ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. मोहिमेसाठी जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात १ हजार ३९२ बुथची स्थापना करण्यात आली होती. सलग पाच दिवस घरोघरी जाऊन ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना लसीकरण केले जाणार आहे. मोहिमेच्या यशस्वीतेसाठी डॉ. मानकर, प्रकाश गवळी, डॉ. काळे, नरेंद्र बेलुकर, संदीप वानखडे, विजय घुगे, एन. एस. किरडे, प्रशांत गुल्हाने, दीपक मलखेडे व संदीप देशमुख यांनी परिश्रम घेतले.पंचगव्हाण येथे लसीकरण मोहिमेचे उद््घाटनग्रामीण भागात पंचगव्हाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांच्या हस्ते पोलिओ लसीकरण मोहिमेचे उद््घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्रीताई राठोड, पंचायत समिती सदस्य आम्रपाली गवारगुरू, सरपंच भास्कर गवारगुरू, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस. वाय. असोले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, डॉ. विवेक पेंढारकर, डॉ. चव्हाण व सैफुल्ला खान यांची उपस्थिती होती.मनपा क्षेत्रात ५२ हजार बालकांना लसीकरणमहापालिका क्षेत्रांतर्गत २५० बुथवर ५२ हजार ८५२ बालकांना पोलिओ लसीकरण करण्यात आले. मोहिमेंतर्गत ९७८ आरोग्य कर्मचारी व ५२ पर्यवेक्षक ांची नियुक्त केली होती. कस्तुरबा गांधी महिला रुग्णालयात आयोजित उपक्रम वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख व डॉ. अजमल खान यांच्या मार्गदर्शनात पार पडला.

 

टॅग्स :Akolaअकोला