शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यात ८४ गर्भवती कोरोना पॉझिटिव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 11:21 IST

आवश्यक प्रतिबंधात्मक उपयायोजना केल्यामुळे जिल्ह्यात गत चार महिन्यात केवळ ८४ गर्भवती पॉझिटिव्ह आल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव थांबता थांबत नसताना गर्भवतींसह बाळंतिणीही कोरोना पॉझिटिव्ह येऊ लागल्याने आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हाने वाढली होती; मात्र योग्य वेळी आवश्यक प्रतिबंधात्मक उपयायोजना केल्यामुळे जिल्ह्यात गत चार महिन्यात केवळ ८४ गर्भवती पॉझिटिव्ह आल्या आहेत.जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर कंटेनमेन्ट झोनमधील गर्भवतीसह बाळंतिणींचेही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह येऊ लागले होते. अशा परिस्थितीत नवजात शिशूंनाही कोरोनाचा मोठ्या प्रमाणात धोका संभवण्याची चिंता आरोग्य विभागाला लागली होती. त्यामुळे जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल होणाऱ्या गर्भवतींची तपासणी केल्या जाऊ लागली.तपासणीचा वेग वाढल्यामुळे योग्य वेळेत गर्भवतींमध्ये कोरोनाचे निदान शक्य झाले. गत चार महिन्यात जिल्हा स्त्री रुग्णालयात तब्बल १,६५८ गर्भवतींचे नमुने घेऊन कोरोनाची चाचणी करण्यात आली. यापैकी ८४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये ७१८ रॅपिड अ‍ॅन्टिजन टेस्ट, तर ९६० आरटीपीसीआर चाचण्यांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आल्याने या सर्व रुग्णांना प्रसूती आणि पुढील उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले.

एकाही शिशूला कोरोनाची लागण नाहीनवजात शिशूंना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी जिल्हा स्त्री रुग्णालयासह जीएमसीमध्येही विशेष खबरदारी घेण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत ८४ गर्भवती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची नोंद असली, तरी एकाही नवजात शिशूला कोरोनाची लागण झाली नाही.

अशी घेण्यात आली विशेष खबरदारीजिल्हा स्त्री रुग्णालयात जिल्ह्यातीलच नव्हे, तर शेजारील जिल्ह्यातील गर्भवतीदेखील प्रसूतीसाठी मोठ्या संख्येने येतात. अशा परिस्थितीत कोरोनाचा धोका टाळण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रातून येणाºया गर्भवतींसाठी स्वतंत्र वॉर्डाची निर्मिती करण्यात आली आहे. शिवाय, प्रत्येक गर्भवतींचे स्क्रीनिंग केले जात आहे.

अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे कळताच संबंधित मातेला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात संदर्भीत करण्यात येते. गर्भवतींना कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हा स्त्री रुग्णालयात आधीच विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. शिवाय, प्रतिबंधित क्षेत्रातून येणाºया गर्भवतींसाठी स्वतंत्र वॉर्डाची निर्मिती केल्याने इतरांना त्याचा धोका नाही.- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्याLady Harding Hospitalलेडी हार्डिंग रुग्णालय