शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात जिल्ह्यातील ८२ गावांना पुरांचा धोका; उपाययोजनांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

By संतोष येलकर | Updated: May 19, 2024 16:00 IST

ग्राम आपत्ती व्यवस्थापन समित्यांच्या बैठका घेण्याची कार्यवाही सुरु

संतोष येलकर, अकोला: पावसाळ्यात जिल्ह्यातील नदीकाठच्या ८२ गावांत पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा धोका असल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित गावांत उपाययोजना करण्यासाठी ग्राम आपत्ती व्यवस्थापन समित्यांच्या बैठका घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना गेल्या आठवड्यात दिले. त्यानुसार जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांमार्फत यासंदर्भात कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पावसाळ्यात अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील नदी व नाल्याकाठची ८२ गावे बाधित होतात.

या पार्श्वभूमीवर पूरपरिस्थितीचा धोका लक्षात घेता, संबंधित गावांमध्ये पूर नियंत्रण आणि आवश्यक उपाययोजनांची कामे करण्यासाठी संबंधित गावांच्या ग्राम आपत्ती व्यवस्थापन समित्यांच्या बैठका घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी ९ मे रोजी मान्सून पूर्वतयारीच्या बैठकीत जिल्ह्यातील तहसीलदारांना दिले. त्यानुसार जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांकडून पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांतील ग्राम आपत्ती व्यवस्थापन समित्यांच्या बैठका घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

पुरामुळे बाधित होणारी गावांची अशी आहे संख्या!

तालुका - गावे

  • अकोला १५
  • बार्शिटाकळी १२
  • अकोट १०
  • तेल्हारा ११
  • बाळापूर १०
  • पातूर १०
  • मूर्तिजापूर १४

पुरामुळे बाधित होणारी अशी आहेत गावे !

  • अकोला तालुका : अकोला , म्हैसांग, एकलारा, कपिलेश्वर, वडद बु., दोनवाडा, धामना, चांगेफळ, म्हैसपूर, चांदूर, सांगवी बु., कुरणखेड, गोत्रा, आगर.
  • बार्शिटाकळी तालुका : चिंचखेड, निंभोरा, तामशी, खांबाेरा, वरखेड, वाघजळी, दोनद खुर्द, टाकळी, राजंदा, सुकळी, वरखेड, सिंदखेड.
  • अकोट तालुका : केळीवेळी, किनखेड, पळसोद, पनोरी, पिलकवाडी, कुटासा, मुंडगाव, अकोट, करोडी, वरुर.
  • तेल्हारा तालुका : मनात्री बु., डवला, तळेगाव वडनेर, तळेगाव पातुर्डा, नेर, सांगवी, उमरी, पिवंदळ, दानापूर, सौंदळा, वारखेड.
  • बाळापूर तालुका : वाडेगाव, बाभूळखेड, कासारखेड, हाता, अंदुरा, लोहारा, कवठा, हातरुण, रिधोरा, सोनाळा.
  • पातूर तालुका : पास्टुल, भंडारज खुर्द, आगीखेड, कोठारी बु., चोंढी, विवरा, आलेगाव, वहाळा बु., सस्ती, तुलंगा.
  • मूर्तिजापूर तालुका : हेंडज, पिंगळा, कोळसरा, भटोरी, दातवी, सांगवी, दुर्गवाडा, दापूरा, हिवरा कोरडे, लाखपुरी, माना, खांदला, पोही, उनखेड.
टॅग्स :Akolaअकोला