शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी : दोन गावांत पात्र ८१० शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 14:10 IST

कर्जमाफीसाठी पात्र ८१० शेतकºयांच्या गावनिहाय याद्या सोमवारी प्रसिद्ध करण्यात आल्या.

अकोला : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांपैकी पहिल्या टप्प्यात अकोला तालुक्यातील गोरेगाव व बाळापूर तालुक्यातील देगाव या दोन गावांत कर्जमाफीसाठी पात्र ८१० शेतकºयांच्या गावनिहाय याद्या सोमवारी प्रसिद्ध करण्यात आल्या. याद्यानुसार पात्र शेतकºयांचे बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व कर्जखात्यातील रकमेची पडताळणी करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले.शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख १२ हजार ३७९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, त्यापैकी बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्यात करण्यात आलेल्या १ लाख ११ हजार २४५ शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकºयांच्या गावनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यासाठी पहिल्या टप्प्यात शासनामार्फत अकोला तालुक्यातील गोरेगाव खुर्द-गोरेगाव बु. आणि बाळापूर तालुक्यातील देगाव या दोन गावांतील शेतकºयांच्या याद्या सोमवारी शासनामार्फत आॅनलाइन प्राप्त झाल्या. प्राप्त झालेल्या पात्र ८१० शेतकºयांच्या गावनिहाय याद्या गोरेगाव खुर्द व देगाव या दोन गावांमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यामध्ये गोरेगाव खुर्द येथे ग्रामपंचायत कार्यालय, सेतू केंद्र, जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा, कॅनरा बँक व गोरेगाव बु. येथील संत गजानन महाराज मंदिर येथे पात्र शेतकºयांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. तर देगाव येथे ग्रामपंचायत कार्यालय, सामान्य सुविधा केंद्र (सीएससी), सेंट्रल बँक शाखा, विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा, स्टेट बँक शाखा इत्यादी ठिकाणी शेतकºयांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. प्रसिद्ध करण्यात आलेल्या याद्यानुसार संबंधित शेतकºयांचे बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व कर्ज खात्यातील रक्कम यासंदर्भात बायोमेट्रिक पद्धतीने पडताळणी व प्रमाणीकरणाचे काम प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले.गावनिहाय पात्र शेतकरी अन् आधार पडताळणी!कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांच्या याद्या गोरेगाव व देगाव या दोन गावांत प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यानुसार दोन्ही गावांत ८१० शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून, त्यामध्ये गोरेगाव येथील ३९७ शेतकरी व देगाव येथील ४१३ शेतकºयांचा समावेश आहे. दोन्ही गावांतील पात्र शेतकºयांपैकी ३५१ शेतकºयांचे बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व कर्जखात्यातील रकमेची पडताळणी सोमवारी सायंकाळपर्यंत करण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शेतकºयांना प्रमाणपत्र वितरित!कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांच्या गावनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर गोरेगाव व देगाव या दोन गावांत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी भेट दिली. जिल्हाधिकाºयांच्या उपस्थितीत शेतकºयांचे खाते क्रमांक, आधार क्रमांक व कर्जखात्यातील रक्कम इत्यादी संदर्भात पडताळणी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते संबंधित शेतकºयांना कर्जमाफीच्या प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी