लोकमत न्यूज नेटवर्कउरळ: अवैध मांसाची वाहतूक करणार्यास उरळ पोलिसांनी कारंजा रमजानपूर टी पॉइंटवर १८ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३0 वाजता अटक केली. त्याच्याकडून ८0 कि लो मांस व दुचाकी जप्त केली. अवैध मांसाची वाहतूक होत असल्याची माहिती उरळ पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोकॉ गजानन ठोंबरे व जयेश शिनगारे यांनी नाकाबंदी करून हातरूणवरून मांस घेऊन येत असलेल्या शे. मल्लंग शे. मोहम्मद कुरेशी यास अटक केली. त्याच्याकडून ८0 किलो मांस किंमत सहा हजार रुपये व दुचाकी क्र. एमएच ३0 झेड ८७६७ असा २६ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपीस अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार पवार यांच्या मार्गदर्शनात पोना. राम आंबेकर व जमादार गजानन ढोणे करीत आहेत.
अवैध ८0 किलो मांस जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 20:16 IST
उरळ: अवैध मांसाची वाहतूक करणार्यास उरळ पोलिसांनी कारंजा रमजानपूर टी पॉइंटवर १८ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३0 वाजता अटक केली. त्याच्याकडून ८0 कि लो मांस व दुचाकी जप्त केली.
अवैध ८0 किलो मांस जप्त
ठळक मुद्दे२६ हजार रुपयांचा ऐवज जप्त उरळ पोलिसांची कामगिरी