शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

७,९०२ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांचे प्रमाणीकरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 11:37 IST

१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील सातही तालुक्यात ७ हजार ९०२ शेतकºयांच्या कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे.

अकोला : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात कर्जमुक्तीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांपैकी २९ फेबु्रवारीपर्यंत ८६ हजार ६२३ शेतकºयांच्या गावनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून, याद्यानुसार शेतकºयांच्या कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रविवार, १ मार्चपर्यंत जिल्ह्यातील सातही तालुक्यात ७ हजार ९०२ शेतकºयांच्या कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे.शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख १२ हजार ३७९ शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले असून, त्यापैकी बँक खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्नित (लिंक) करण्यात आलेल्या १ लाख ११ हजार ७९ शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत. कर्जमुक्तीसाठी पात्र शेतकºयांपैकी गावनिहाय याद्या प्रसिद्ध करण्याच्या पहिल्या व दुसºया टप्प्यात २९ फेबु्रवारीपर्यंत जिल्ह्यातील ८५३ गावांमध्ये ८६ हजार ६२३ शेतकºयांच्या गावनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रसिद्ध करण्यात आलेल्या शेतकºयांच्या याद्यानुसार गावपातळीवरच शेतकºयांच्या कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये शेतकºयांचे बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक व कर्जखात्यातील रक्कम इत्यादींचे प्रमाणीकरण करण्यात येत आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या याद्यानुसार ८६ हजार ६२३ शेतकºयांपैकी १ मार्चपर्यंत जिल्ह्यातील ७ हजार ९०२ शेतकºयांच्या कर्जखात्यांचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAdhar Cardआधार कार्ड