शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
2
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
3
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
4
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
5
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
6
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
7
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
8
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
9
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
10
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
11
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
12
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
13
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
14
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
15
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
16
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
17
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
18
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
19
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
20
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन

अकोला जिल्हा परिषदेतील ७६ शिक्षकांच्या फायली गहाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 2:12 AM

अकोला : आंतरजिल्हा बदलीने पदस्थापना दिलेल्या ७६ शिक्षकांना पदस्थापना दिल्याच्या फायलीच जिल्हा परिषदेत उपलब्ध नाहीत. त्यांचे केवळ आंतरजिल्हा बदली आदेशच कार्यालयात असल्याने आता जिल्हा परिषदेत त्या फायली तत्त्काळ उपलब्ध करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशी नोटीस मुख्य कार्यकारी अधिकारी एस.रामामूर्ती यांनी शिक्षकांनाच बजावली. त्यामुळे शिक्षकांचीच कोंडी झाली आहे. 

ठळक मुद्देआंतरजिल्हा बदलीसाठी परस्पर चालल्या फायली; कारवाईची नोटीस

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आंतरजिल्हा बदलीने पदस्थापना दिलेल्या ७६ शिक्षकांना पदस्थापना दिल्याच्या फायलीच जिल्हा परिषदेत उपलब्ध नाहीत. त्यांचे केवळ आंतरजिल्हा बदली आदेशच कार्यालयात असल्याने आता जिल्हा परिषदेत त्या फायली तत्त्काळ उपलब्ध करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, अशी नोटीस मुख्य कार्यकारी अधिकारी एस.रामामूर्ती यांनी शिक्षकांनाच बजावली. त्यामुळे शिक्षकांचीच कोंडी झाली आहे. जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदलीने रूजू झालेल्या शिक्षकांमुळे बिंदूनामावलीचा मोठा घोळ झाला आहे. परिणामी, शिक्षकांची बिंदू नामावलीही मंजूर होऊ शकली नाही. त्या घोळाची चौकशी अमरावती विभागाचे उपायुक्त (विकास) यांच्या पथकाने केली. त्यामध्ये जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदलीने रूजू झालेल्या ७४ शिक्षकांचे केवळ आदेश उपलब्ध आहेत. त्या आदेशानुसार जिल्हा परिषदेत पदस्थापना देण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयात फाइल कोणी तयार केली. त्या फाइलला कोणी मंजुरी दिली. त्यानुसार शिक्षकांना पदस्थापना देण्यासाठीचे आदेश कोणी दिले. फाइल सुरू होण्यापासून शेवटपर्यंतचा प्रवास, याबाबतचा कुठलाच कागद जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात उपलब्ध नसल्याचे पुढे आले. त्यानुसार आता शिक्षकांनाच फाइली सादर करण्याची नोटीस मुख्य कार्यकारी अधिकारी एस.रामामूर्ती यांनी २ डिसेंबर रोजी बजावली आहे.

फाइलची जबाबदारी कुणाची?इतर जिल्हा परिषदेतून आलेले शिक्षक रूजू झाल्यानंतर त्यांच्या फाइल जतन करण्याची जबाबदारी अकोला जिल्हा परिषदेची आहे; मात्र त्या फाइल शिक्षकांनी परस्पर चालवल्या. त्या माध्यमातूनच त्यांनी पदस्थापना मिळवली. त्यामुळे त्यांनीच फाइल उपलब्ध करून द्याव्या, असा पवित्रा जिल्हा परिषदेने घेतल्याने याप्रकरणी कार्यालय आणि शिक्षक दोघांचीही चांगलीच गोची होणार आहे. 

कार्यालयीन पद्धतीला फाटाशिक्षकांनी आंतरजिल्हा बदलीने जिल्हा परिषदेत रूजू होताना कार्यालयीन पद्धतीचा अवलंब केला नाही. परस्पर रूजू झाले. हा प्रकार गंभीर आहे. शिक्षकांनी फाइल सादर न केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ अन्वये कारवाई का करू नये, याचा खुलासाही उलटटपाली मागवण्यात आला आहे.  

टॅग्स :zpजिल्हा परिषदAkola cityअकोला शहर