अकोट, दि. ३१- अकोट तालुक्यातील मानकरी शेतशिवारात ७५ हजार रुपये किंमतीचे बेवारस सागवान वन विभागाच्या कर्मचार्यांनी जप्त केले. वन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोट प्रादेशिक पश्चिम विभाग मेळघाटच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून ३0 मार्च रोजी मानकरी शेतशिवारातील शंकरजीच्या मंदिराजवळ टाकलेल्या धाडीत ७५ हजार रुपये किंमतीचे सागवानचे १५ नग बेवारस स्थितीत आढळून आले. याप्रकरणी वन विभागाने अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय वन अधिनियम कलम २६, १ (अ), ६१, ४१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई वन परिक्षेत्र अधिकारी सुरेश वळोदे, सुधीर हाते, मोहन धवसे, बावनरे, देवीदास भारसाकळे यांनी केली.
७५ हजारांचे सागवान जप्त
By admin | Updated: April 1, 2017 02:46 IST