शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागात ७४ हजार रुग्णांना आपत्कालीन रुग्णवाहिका सेवेचा लाभ!

By admin | Updated: March 10, 2016 01:55 IST

विभागात धावताहेत ९९ रुग्णवाहिका, ११ हजार रुग्णांवर उपचार.

अकोला: आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध करण्याच्या उद्देशाने शासनाने राज्यभरामध्ये अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवा सुरू केली. या रुग्णवाहिकेसाठी १0८ हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला. गरजू रुग्णाने या क्रमांकावर संपर्क साधल्यास, त्याला २0 ते १५ मिनिटांमध्ये रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध करण्यात येते. रुग्णांना जीवनदान देण्याचे कार्य या रुग्णवाहिकांच्या माध्यमातून होत आहे. गत वर्षभरामध्ये अमरावती विभागामध्ये ७४ हजार ८६६ रुग्णांनी या सेवेचा लाभ घेतला. संकटकाळात या रुग्णवाहिका रुग्णांसाठी जीवनदायिनी ठरली आहे. अपघात, सर्पदंश, हृदयविकाराचा झटका, महिलेची प्रसूती, हल्ला प्रकरणातील जखमी रुग्ण, भाजलेल्या रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहचविण्याचे कार्य या रुग्णवाहिकांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी या रुग्णवाहिका महत्त्वाच्या ठरत आहेत. १0८ क्रमांकावर फोन करून रुग्णाचे नातेवाईक अत्याधुनिक रुग्णवाहिकेचा लाभ घेत आहेत. फोन लावल्यावर अवघ्या काही मिनिटांतच रुग्णवाहिका घटनास्थळावर दाखल होत असल्याचा अनुभव आहे. रुग्णवाहिकेमध्ये अत्याधुनिक उपकरणे आहेत. यात कृत्रिम श्‍वासोच्छवास यंत्र, रक्तदाब यंत्र, सलाइनची व्यवस्था आहे. त्यामुळे रुग्णवाहिकेमध्येच प्रारंभिक उपचार करण्यात येतात. २0 मार्च २0१४ ते जानेवारी २0१६ या कालावधीमध्ये अकोला जिल्ह्यातील ११ हजार १४६ रुग्णांनी या सुविधेचा लाभ घेतला. शेकडो रुग्णांना रुग्णवाहिकेच्या सेवेतून जीवनदान प्राप्त झाले. रुग्णवाहिकेचा लाभ घेणार्‍या अमरावती विभागातील रुग्णांची संख्याअकोला - १११४६अमरावती- १९0८७बुलडाणा- १५६११वाशिम- ९४३८यवतमाळ- १९५८४अकोला जिल्ह्यात १५ रुग्णवाहिका अकोला जिल्ह्याचे क्षेत्रफळ आणि लोकसंख्या पाहता, शासनाकडून १५ अत्याधुनिक रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यात चार अँडव्हांस लाइफ सेव्हिंग रुग्णवाहिका आणि ११ बेसिक लाइफ सेव्हिंग रुग्णवाहिकांचा समावेश आहे. बुलडाणा जिल्ह्यात २३, अमरावती जिल्ह्यात २७, यवतमाळ जिल्ह्यात २३ आणि वाशिम जिल्ह्यात ११ अशा एकूण ९९ रुग्णवाहिका धावताहेत.४५ चिकित्सक, ३५ सहायकअकोला जिल्ह्यात धावणार्‍या १0८ क्रमांकाच्या १५ रुग्णवाहिकांसाठी ३५ चालक आहेत. आपत्कालीन स्थितीत सहायक दोन चरणांमध्ये काम करतात. यात ४५ चिकित्सक रुग्णांवर उपचार करण्यासाठी आणि त्यांना जवळपासच्या रुग्णालयांमध्ये सुरक्षित नेण्यासाठी कार्यरत आहेत.