शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

६४ खेडी पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीसाठी ७४ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 14:16 IST

७४ लाख ३१ हजार रुपये निधी देण्यास पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने १३ मे रोजी मंजुरी दिली आहे.

अकोला: जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील खांबोरा ६४ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या विशेष दुरुस्तीच्या कामासाठी टंचाई अंतर्गत ९९ लाख ३२ हजार ४०० रुपये अंदाजपत्रकीय किमतीच्या प्रस्तावानुसार ७४ लाख ३१ हजार रुपये निधी देण्यास पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने १३ मे रोजी मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, कामाची निविदा २९ मेपर्यंत तर १५ जूनपर्यंत काम पूर्ण करण्याची अटही घालण्यात आली आहे.खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून खांबोराजवळील उन्नई बंधाऱ्यात पाणी सोडण्यात येते. तेथून योजनेंतर्गत गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो; मात्र पाणी पुरवठा करण्यासाठी १५ वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या पंपांची पाणी फेकण्याची क्षमता कमी झाली असून, जलवाहिनीही ठिकठिकाणी शिकस्त झाली आहे. त्यामुळे या योजनेंतर्गत गावांना दररोज नियमित पाणी पुरवठा करणे अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे योजनेंतर्गत गावांना आठ ते दहा दिवसांआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यानुषंगाने २०१९ च्या पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात खांबोरा ६४ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या विशेष दुरुस्तीची उपाययोजना प्रस्तावित करण्यात आली. त्यानुसार योजनेंतर्गत गावांना दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी योजनेची विशेष दुरुस्ती करणे तसेच या योजनेंतर्गत उगवा या समावेश करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात आला होता. खांबोरा प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या विशेष दुरुस्तीच्या कामासाठी अंदाजपत्रकीय कि मतीनुसार ९९ लाख ३२ हजार ४०० रुपयांचा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांमार्फत १४ फेबु्रवारी रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला. त्यावर शासनाने १३ मे रोजी निधी देण्यास मंजुरी दिली आहे.- मुदतीत काम पूर्ण करण्याची अटविशेष दुरुस्तीचे काम जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून केले जाईल. त्यासाठी निविदा प्रक्रिया २९ मेपर्यंत पूर्ण न झाल्यास शासनाची मंजुरी रद्द होणार आहे. योजनेच्या दुरुस्तीनंतर देखभाल व दुरुस्ती ग्रामपंचायतमार्फत करावी लागणार आहे. विभागीय आयुक्त कामानुसार निधी देतील.- प्रस्तावानुसार २५ लाखांची कपातपाणी पुरवठा विभागाने ९९.३२ लाख रुपये किमतीचा प्रस्ताव पाठविला होता. त्यावर शासनाने ७४. ३१ लाख रुपयेच मंजूर केले आहेत. त्यामध्ये २५ लाखांची कपात करण्यात आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद