शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

महान धरणात ७१.६८% जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 10:55 IST

. दमदार पाऊस होत असल्याने, धरणातील जलसाठा ७१.६८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमहान : अकोला शहरासह मूर्तिजापूर शहर, बोरगाव मंजू व खांबोरा ग्रामीण पुरवठ्यावरील एकूण ६४ खेडेगावांची तहान भागविणाऱ्या महान धरणाच्या जलसाठ्यात मुसळधार पावसामुळे झपाट्याने वाढ होत आहे. दमदार पाऊस होत असल्याने, धरणातील जलसाठा ७१.६८ टक्क्यांवर पोहोचला आहे.गेत दोन दिवसांपासून महान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत सुरू असलेल्या पावसमुळे धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. २५ जुलै रोजी सकाळी महान धरणात ११३५.२० फूट, ३४६.०१ मीटर, ६१.९० दलघमी व ७१.६८ टक्के एवढा जलसाठा झाला होता. गतवर्षी २५ जुलै २०१९ रोजी धरणात केवळ ३.१५ टक्के जलसाठा उपलब्ध होता. त्या तुलनेत महान धरणात शनिवार रोजी ६९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. १ जून ते २५ जुलैपर्यंत एकूण ३२६ मि.मी. पावसाची नोंद महान पाटबंधारे विभागात करण्यात आली आहे. महान धरणाच्या प्रत्येक गेटची साइज १६ बाय ४० फूट असून, या मुख्य गेटवर १० फूट पाणी आले आहे. धरणाचा जलसाठा १०० टक्क्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी ६ फूट पाण्याची आवश्यकता आहे.धरणाच्या वाढत्या जलसाठ्याकडे कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे, बोरगाव मंजूचे उपविभागीय अधिकारी अभिजित नितनवरे, महान शाखेचे शाखा प्रबंधक नीलेश धारे, एस. व्ही. जनोरकर, शंकर खरात, पिंपळकर, पाठक, हातोलकर, आगे, झळके हे लक्ष ठेवून आहेत. अकोलेकर, शेतकऱ्यांची चिंता मिटली!धरणाची पाणी पातळी ७० ते ८० टक्क्यांवर पोहोचल्यावर पाणी नदीपात्रात सोडण्यात येते. सध्या पातळी ७२ टक्क्यांवर पोहोचल्याने अकोलेकर नागरिकांसह शेतकºयांची चिंता मिटली आहे. महान धरण ते उन्नई बंधाºयापर्यंत नदीकाठावरील शेतकºयांना दरवर्षी रब्बी हंगामाकरिता धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येते.नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा!पाणी पातळी आराखड्यानुसार ३१ जुलैपर्यंत धरणात ८० टक्क्यांपर्यंत जलसाठा पोहोचल्यास शिल्लक पाणी धरणातून नदीपात्रात सोडावे लागते. धरणात सध्या ७२ टक्के जलसाठा असून, यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे धरणाचे गेट उघडण्याची शक्यता असल्याने महान पाटबंधारे विभागाकडून नदीकाठावरील ग्रामपंचायतींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :Katepurna Damकाटेपूर्णा धरणAkolaअकोला